महागाई विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे गडचिरोली येथे आंदोलन

108

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : येथील इंदिरा गांधी चौक येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महागाई विरोधी ‘५० खोके महागाई एकदम ओके’ आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व युवक अध्यक्ष लिलाधर भरडकर यांनी केले.
आताच्या घडीला केंद्र सरकारने गहु, तांदुळ, दाळ व अन्य कळधान्यावर सरकारने जीएसटी लावण्यात आल्याने त्याचा शेतकऱ्यांना नुकसान असून व्यापारी फायदा घेत आहेत. सर्वसामान्य जनतेला मात्र आर्थिक भुर्दंड बसत आहे. केंद्रसरकार राज्याचे सरकार बदल करण्यासाठी आमदारांना आर्थिक साहाय्य करुन आमदार फोडा फोडीच राजकारण करते. परंतू सामान्य जनतेचे प्रश्न किंवा महागाई बदल बोलत नाही आहे. सामान्य कुटुंबातील व्यक्तींना आज गॅस सिलेंडरचे ५० रुपये दरवाढ झाल्याने आजच्या घडीला १११० रु. चा गॅस सीलेंडर ‍मिळत असल्याने पुन्हा चुलीवर सामान्य कुटुंबाचा गाडा चालवत आहे. त्याचा विरोध म्हणून आज निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, प्रदेश युवक सरचिटणीस, प्रा. रिंकू पापडकर, युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद पवार, शहर अध्यक्ष अमोल कुळमेथे, रणजीत रामटेके, योगेश नांदगाये, कपील बागडे, संजय कोचे, इंद्रपाल गेडाम, फईम काजी, आकाश पगाडे, तालुकाध्यक्ष श्रीधर येरावार, तालुका अध्यक्ष विवेक बाबनवाडे, सदीप तुंकलवार, रुपेश चुधरी, शिवराम सोदुरवार, गिरीधर सोदुरवार, महेश खोब्रागडे, नेताजी कोडाप, नामदेव मोहुर्ले, आशीक बर्लावार, गजानन तुंकलवार, आकाश खोब्रागडे, रविंद्र नेचलवार, अंकुश मामीडवार, अरुण नैताम, महेश टीपले, गुलाम शेख, धनराज मेश्राम आदी उपस्थित होते.