सावली तालुक्यातील व्याहाड बुज. येथे विविध घडलेल्या घटनांच्या संदर्भात खा‌. अशोकजी नेते‌‌ यांनी आर्थिक मदत देऊन कुटुंबीयांचे केले सांत्वन

101

– घटनांची दखल घेण्याचे अधिकाऱ्यांना दिले निर्देश

विदर्भ क्रांती न्यूज

सावली : दि. ३० ऑगस्ट २०२२ ला हरितालिका तृतीया (गौरी पुजन) या दिनाचे औचित्य साधून सावली तालुक्यातील व्याहाड बुज. येथे विविध घडलेल्या घटनांच्या संदर्भात खा. अशोकजी नेते यांनी आर्थिक मदत देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.

खा. अशोकजी नेते यांनी सावली दौऱ्याप्रसंगी आले असता व्याहाड बूज. येथे विविध ठिकाणी घडलेल्या घटनेच्या संबंधित माहिती तालुकाध्यक्ष अविनाश पाल व दिवाकर गेडाम, ग्रामपंचायत सदस्य व्याहाड बुज. यांनी माहिती दिली असता यांची दखल घेत या क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांनी याबाबतचे गांभीर्य लक्षात घेत व्याहाड बुज. येथील मजुरी करणारा काही दिवसांंपूर्वी स्वर्गीय दशरथ गेडाम यांचा गिट्टी खदाणमध्ये मजुरीचे काम करीत असताना अपघाती निधन झाले. ही बातमी कळल्यानंतर खासदार साहेब यांनी त्यांच्या पाश्चात्त्य त्यांच्या पत्नीला आर्थिक मदत देऊन त्यांच्या कुटुंबीयांचा सांत्वन केले.

तसेच पोळ्याच्या दिवशी दोन दिवसाच्या अगोदर रानटी डुकराने श्री. पुरुषोत्तम सखाराम जेंगटे या गुराखीला जखमी करून सोडले. यासंदर्भात खासदार अशोकजी नेते यांना माहिती कळताच त्या गुराखीच्या घरी जाऊन त्याच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच त्यांना आर्थिक मदत देऊन सांत्वन केले. त्यांच्या तब्येतीबाबत सीएस डॉ. अनिल रूडे यांना दूरध्वनीवरून या संदर्भाची दखल घेत त्यांना सूचना केल्या आणि वनविभागाचे अधिकारी यांना सुद्धा चौकशी करून आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले.

यावेळी शामरावजी गेडाम हे सुद्धा जखमी इसम असल्याचे कळताच यांना सुद्धा आर्थिक मदत देऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी करून विचारपूस करण्यात आली. तसेच सुनिता कवाडकर यांचे घर पडल्याची माहिती मिळताच व त्यांना कोणीच आधार नसल्याचे कळताच त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत देऊन त्यांच सांत्वन करण्यात आले.

याप्रसंगी खा. अशोकजी नेते, तालुकाध्यक्ष तथा ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाल, दिवाकर गेडाम ग्रामपंचायत सदस्य, डॉ. तोडेवार, भाजपा युवा नेते दिवाकर म्याकलवार, भाजपा ज्येष्ठ नेते सुरेशजी सुत्रपवार, सुधाकर म्याकलवार, पत्रुजी गेडाम, रविंद्र निकेसर, रमेश साहारे, माजी तं. मु. अध्यक्ष ज्ञानेश्वर निकोडे, तंटामुक्ती अध्यक्ष भास्करजी शेंडे, दिवाकर सातपैसे, माणिक वासेकर, मुखरू बुरले, राजू गेडाम, रामभाऊ गेडाम, मारोती शेरकी, जगदिश हुड, किसन ठाकरे, देवानंद वासेकर, गुरुदास वासेकर, सुनिल भानोसे, राजु मेश्राम, संतोष मेश्राम, सुधीर वासेकर, दीपक वासेकर, तसेच अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.