सावली तालुक्यातील हिरापूर येथील झरकर कुटुंबीयांचे खा. अशोकजी नेते यांनी केले सांत्वन व आर्थिक मदत

58

विदर्भ क्रांती न्यूज

सावली : तालुक्यातील हिरापूर येथील भक्तदास श्रीरंग झरकर हे शेत शिवारात काम करीत असताना तिथेच अचानक दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने अचानक हल्ला करून यात जागीच  ठार केले.

याबाबतची माहिती मिळताच या क्षेत्राचे खा. अशोकजी नेते यांनी वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या मृतकाच्या परिवारांला घरी जाऊन आर्थिक मदत देऊन परिवारांचे सांत्वन केले. तसेच खा. अशोकजी नेते यांनी वनविभागाचे अधिकारी यांना शासन स्तरावर तातडीने कामे करुन मदत देण्याचे निर्देश देऊन सूचना केल्या.

याप्रसंगी खा. अशोकजी नेते तालुकाध्यक्ष तथा आबिसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाल, भाजपाचे ज्येष्ठ नेते दौलतराव भोपये, केशव झरकर, रवि झरकर, रमेश बोबाटे, RFO राजुरकर, नायब तहसीलदार कांबळे, कोडापे, नामदेव झरकर, शिवराम झरकर, तसेच वनअधिकाऱी कर्मचारी, कार्यकर्ते व गावातील नागरिक उपस्थित होते.