धानोरा येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा

134

विदर्भ क्रांती न्यूज

डचिरोली : धानोरा येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान, शिव मंदिर ते हनुमान मंदिर तसेच गावातील प्रमुख मार्गाने वाजत गाजत रॅली काढण्यात आली.

या तान्हा पोळ्यात धानोरा शहरातील बालगोपाल विविध वेशभूषा परिधान करून व नंदीबैलांची सजावट करून उत्साहात सहभागी झाले होते. या तान्हा पोळ्यात व रॅलीमध्ये शहरातील नागरिक, बालगोपाल व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.