रानटी डुकराने व्याहाड बुज. येथील गुराख्यास केले जखमी

138

– खा. अशोकजी नेते यांनी केली जखमी गुराख्याच्या प्रकृतीची विचारपूस

विदर्भ क्रांती न्यूज

सावली : तालुक्यातील व्याहाड बुज. येथील गुराखी श्री. पुरुषोत्तम सखारामजी जेंगठे हे सकाळी १० वाजताच्या सुमारास दैनंदिन कामानुसार शेळी राखण्यासाठी जात असताना आसोलामेंढा प्रकल्पाच्या नहरात रानटी डुक्कर पडला होता. नहराच्या (पाटाच्या) बाहेर तो डुक्कर निघाला. दरम्यान, शेळीपालन गुराखी वाटेने जाताना रानटी डुकराची धडक बसली. यात तो गंभीररित्या जखमी झाला. गुराख्याने आरडाओरड केली असता आजूबाजूचे लोक धावून आले व त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र व्याहाड बुज. येथे उपचारासाठी नेण्यात आले. परंतु गंभीररित्या जखमी झाल्याने पुुुुुुढील उपचारासाठी त्याला सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे रेफर करण्यात आले.
त्यावेळी ज्ञानेश्वर निकोडे, कवडूजी ठाकूर व इतर युवावर्ग धावून आले. गडचिरोली येथील दवाखाण्यात जखमी गुराखी पोहचताच हिंमत मोटघरे ग्रामपंचायत सदस्य व सुधाकर म्याकलवार सामाजिक कार्यकर्ते यांंनी दूरध्वनीवरून दिवाकर गेडाम यांना घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती देण्यात आली. माहिती मिळाल्यावर लगेच घडलेल्या घटनेची माहिती खासदार अशोकजी नेते यांना निदर्शनास आणून दिल्यानंतर तत्काळ घटनेची गांभीर्याने दखल घेता खा. अशोकजी नेते यांनी रुग्णाच्या उपचारासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिलजी रूडे यांना माहिती देऊन ताबडतोब उपचारासाठी सांगण्यात आले. तसेच रुग्णाची फोनवरून विचारपूस केली. तसेच त्यावेळी सर्पदंश झालेले रुग्ण शामरावजी गेडाम यांची सुद्धा विचारपूस करण्यात आली.