शासकीय आदिवासी मुलांमुलींचे वसतिगृह त्वरित सुरू करण्यात यावे : माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी

113

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालये सत्र २०२२ – २०२३ चे सत्र सुरू होऊन दोन महिने पूर्ण झाली असून, अजूनपर्यंत जिल्ह्यातील आदिवासी वसतिगृह सुरू झालेले नाही. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. करिता जिल्ह्यातील सर्व वसतिगृह सुरू करण्याबाबत डॉ. नामदेवराव उसेंडी माजी आमदार तथा महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांनी मा. ना. विजयकुमार गावित मंत्री, आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य यांची भेट घेऊन शुभेच्छा देत आदिवासीच्या विविध समस्यांंबाबत चर्चा करण्यात आली.
या चर्चेत मागील सत्रातील विद्यार्थ्यांच्या शालेय व महाविद्यालयीन गणवेशाची रक्कम त्वरित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावे, नामांकित शाळेतून दहावी वर्ग पास झालेल्या विद्यार्थ्यांचे पुढील वर्ग ११ वी वर्गात प्रवेश देण्यात यावे, आदिवासी वसतिगृहाची डीबीटी योजना बंद करण्यात यावे. आदिवासीच्या विविध समस्यासह आदिवासीच्या सर्वांगीण विकास कसा करता येईल, असे यावेळी डॉ. नामदेवराव उसेंडी माजी आमदार यांनी ना. विजय कुमार गावित मंत्री आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य यांच्याशी चर्चा केली.