राजीवजींच्या दूरदृष्टीनेमुळेच भारतात डिजिटल इंडियाची खरी सुरुवात : महेंद्र ब्राम्हणवाडे

87

– जिल्हा काँग्रेसच्या वतीने माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांना अभिवादन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राजीव गांधी यांनी आधुनिक भारताचा पाया रोवला असून संघनक क्रांतीच्या माध्यमातून भारतात डिजिटल इंडियाची खरी सुरुवात त्यांनीच केली आहे. त्यांच्या दूरदृष्टीने भारताच्या विकासाला एक नवी दिशा व गती मिळाली आहे, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले.
जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोलीच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्रदेश महासचिव तथा जिल्हाप्रभारी डॉ. नामदेव किरसान, प्रदेश सचिव डॉ. चंदा कोडवते, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, शहराध्यक्ष सतीश विधाते, गावतुरे, ओबीसी सेल प्रदेश उपाध्यक्ष रमेश चौधरी, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, ओबीसी सेल अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, जिल्हा उपाध्यक्ष शँकरराव सालोटकर, ता. अध्यक्ष नेताजी, सहकार सेल अध्यक्ष शामराव चापले, रोजगार स्वयंरोजगार सेल कार्याध्यक्ष पुष्पलता कुमरे, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, अनुसूचित जाती विभाग महिला अध्यक्ष अपर्णा खेवले, विनोद लेनगुरे, समय्या पसुला, काशीनाथ भडके, वसंत राऊत, कुणाल पेंदोरकर, अब्दुल पंजवाणी, दिवाकर निसार, प्रभाकर कुबडे, ढिवरू मेश्राम, हरबाजी मोरे, दीपक रामने, रुपेश टिकले, संजय चन्ने, भैयाजी मुद्दमवार, श्रीनिवास ताडपल्लीवार, संदीप भैसारे, निखिल खोब्रागडे, तौफिक शेख, सुदर्शन उंदीरवाडे, राज डोंगरे, रुपेश सलामे, शुभम किरमे, प्रफुल बारसागडे, अंकुश बारसागडे, चारुदत्त पोहाणे, सुधीर बांबोळे, जावेद खान, स्वप्नील चौखुंडे, मजीद सय्यद, कल्पना नंदेश्वर, मंगला दास, सुनीता रायपुरे, आशा मेश्राम, अर्चना मेश्राम, नीलकंठ बावणे, मधुकर बावणे, दादाजी बावणे, शंंकनाथ बावणे, गजानन रोहनकर, मनोहर गेडाम, यशवंत गुरनुले, देविदास बोलीवार सह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.