विदर्भ क्रांती न्यूज
चंद्रपूर : जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथील भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयात राखी उत्सव साजरा करण्यात आला. भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात खा. अशोकजी नेते, माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर, प्रकाशजी वाघमारे प्रदेश सदस्य, तालुकाध्यक्ष अविनाश पाल यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा उत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.