– 15 ऑगस्टला AIM स्पर्धा परीक्षा केंद्रामार्फत भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून AIM स्पर्धा परीक्षा केंद्र गडचिरोली मार्फत 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून 15 ऑगस्टला AIM स्पर्धा परीक्षा केंद्रामार्फत भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
13 ऑगस्ट 2022 रोजी AIM स्पर्धा परीक्षा केंद्रातर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. जिल्हा सत्र न्यायालयपासून, टी पॉईंट ते पोलीस मुख्यालय या परिसरात स्वच्छता करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी परिसरातील प्लास्टिक, इतर कचरा व हातपंप येथे वाढलेला गवत काढून परिसर स्वच्छ केले.
14 ऑगस्ट 2022 रोजी गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या सायकल रॅली व मॅरेथॉनमध्ये AIM अकॅडमीचे विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले. नंतर जिल्हा सत्र न्यायालयापासून ते CRPF कॅम्पपर्यंत व एम.आय.डी.सी. ग्राउंडच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये जवळपास 60 ते 70 वेगवेगळ्या जातींंच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी AIM स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक अभिजित मोहुर्ले, शारीरिक शिक्षक सुरज गोर्लावार, शिक्षक गणेश बोर्लावार, हर्षल बरबटकर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.