खा. अशोकजी नेते यांनी केली वाघाच्या हल्ल्यात मृत्त पावलेल्या परिवाराचे सांत्वन व आर्थिक मदत

68

– गडचिरोली जिल्ह्यातील बोदली येथील घटना

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : तालुक्यातील बोदली येथील गुराखी मारोती निंबाजी पिपरे हे शेत शिवारात गुरे चारत असताना तिथेच अचानक दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने अचानक गुराखीवर हल्ला करून यात गुराखीचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना ६ ऑगस्ट २०२२ शनिवारला सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. मारोती निंबाजी पिपरे (वय ६७) रा. बोदली असे मृतकाचे नाव आहे. त्यांच्यामागे एक पत्नी व मुलगा असा आप्तपरिवार आहे.

याबाबतची माहिती मिळताच या क्षेत्राचे खा. अशोकजी नेते यांनी वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या मृतकाच्या परिवारांला घरी जाऊन आर्थिक देऊन परीवारांचे सांत्वन केले. याप्रसंगी खा. अशोकजी नेते यांच्या सोबत आकाश गजानन निकोडे सरपंच ग्रा. पं. बोदली तथा युवा मोर्चा भाजपाचे तालुका अध्यक्ष गडचिरोली, नितीन कुनघाडकर बोदली, मुलगा सदाशिव मारोती पिपरे, पत्नी अनुसया मारोती पिपरे, उपवनसंरक्षक शर्मा, वनाधिकारी भडके, तसेच वनअधिकाऱी, कर्मचारी उपस्थित होते.