नरेंद्र (श्यामबाबूजी) पुगलिया यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त रविवारी बाबुपेठ येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन

86

विदर्भ क्रांती न्यूज

चंद्रपूर : श्री. गौरव पुगलिया यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मा. श्री. नरेंद्र (श्यामबाबूजी) पुगलिया यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या माध्यमातून रविवार, 7 ऑगस्ट रोजी जय बजरंग क्रीडा व व्यायाम प्रसारक मंडळ बाबुपेठ येथील भव्य पटांगणावर भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवारी सकाळी 9 वाजता श्री हनुमान मूर्तींचे महाअभिषेक, 10 वाजता आरोग्य शिबिराचे उद्घाटन, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, बालरोग शिबिर, स्त्रीरोग शिबिर, दुपारी 4 वाजता सुंदर कांड पूजन व महाआरती, सायंकाळी 7 वाजता सुगम संगीत कार्यक्रम व महाप्रसाद कार्यक्रम होणार आहे. या आरोग्य शिबिरात बीपी, शुगर, थायराईड, जनरल चेकअप व मोफत औषधांचे वाटप करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जय बजरंग क्रीडा व व्यायाम प्रसारक मंडळ बाबुपेठ, चंद्रपूर व जय बजरंग भोजनालय बाबुपेठ, चंद्रपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.