विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : कुरखेडा शहरातील गांधी चौक कुरखेडा येथे २ ऑगस्टला नागपंचमी निमित्ताने विविध सापांंना जीवनदान देऊन निसर्गाचे जतन करणारे सर्पमित्र यांचा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष चांगदेव फाये व पदाधिकारी यांच्या हस्ते दुपट्टा श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
यावेळी स्थानिक गांधी चौक कुरखेडा येथे नागपंचमीच्या दिवशी शहरात निघालेल्या सापांना पकडून त्यांना जंगलात सोडून जिवनदान देण्यात आले.
यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये यांच्यासह पाणी पुरवठा सभापती अँड. उमेश वालदे, माजी सभापती प्रा. नागेश्वर फाये, नगरसेवक सागर निरंकारी, जिल्हा सचिव तथा नगरसेवक अतुल झोडे, भाजयुमो तालुका अध्यक्ष विनोद नागपूरकर, भाजयुमो तालुकामंत्री उल्हास देशमुख, भाजयुमो जिल्हा सचिव प्रशांत हटवार,तालुका उपाध्यक्ष मंगेश मांडवे, तालुका महामंत्री तुषार कुथे, राहुल गिरडकर, रोशन कुंभलवार, पंकज डोंगरे, पुष्पराज राहांगडाले, मोनेश मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते ईश्वर ठाकूर, शहजाद हाशमी, मृणाल माकडे, प्रवेश सहारे, बंटी देवगडले, स्वप्निल खोब्रागडे व भारतीय जनता युवा मोर्चा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते केले. यावेळी सर्पमित्र रोशन मेश्राम, ताराचंद कापगते, गणेश चौधरी, हिरालाल चौधरी, तुषार कुथे हया आदी सर्पमित्रांंचा सत्कार करण्यात आला.