विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचेे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी आज गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली व रूग्णांची पाहणी केली. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा सह श्यल्यचिकित्सक डॉ. सोळंकी व त्यांचे सहकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी आमदार महोदयांनी रुग्णालयात दिल्या जाणाऱ्या जेवणाची व्यवस्था पाहिली व रुग्णांना किती प्रमाणात जेवण दिले जाते याबाबतची माहिती जाणून घेतली व त्यात काही सुधारणाही सांगितली.