तालुक्यातील अनेक भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांंसोबत संवाद साधण्यासाठी आ. डॉ. देवराव होळी यांचा झंझावाती मोटार सायकल दौरा

48

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : नुकताच जिल्ह्यात झालेल्या महापुरामुळे तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले शेतकरी शेतमजूर बांधव हवालदिल झाले काय बोलावे कुणाला सांगावे कळेना ? तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे वारंवार तक्रारी येत आहेत. साहेब, आमच्या शेतीचा पंचनामा झाला नाही कितीदा तलाठी कार्यालयात चकरा मारायचे ? या विषयाची दखल घेऊन गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांना थेट बांधावर भेट देऊन संवाद साधण्याचा कार्यक्रम
आखला आहे व विधानसभा मतदार संघातील कामकाज आटोपून वेळ मिळेल तेव्हा सरळ बांधावर मोठी वाहन जात नसल्याने मोटार सायकलने जाऊन शेतकरी शेतमजूर यांच्याशी संवाद साधण्याचा सपाटा चालविला आहे  तसेच आजपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतीच्या बांधावरील तक्रारीचे निवारण सुद्धा आमदार डॉ. देवराव होळी प्रत्यक्ष बांधावर जाऊन करीत आहेत. तालुक्यातील अनेक शेतकरी बांधावर आपली समस्या सांगत आहेत. या उपक्रमाबद्दल तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर बांधव यांच्याकडून अभिनंदन केले जात आहे. आमदार डॉ. देवराव होळी थेट बांधावरुन तहसीलदार व तलाठी यांना निर्देश देऊन माहिती कळवत आहेत व स्वतः जिल्हाधिकारी यांच्यासोबत सतत संपर्कात आहेत.