जिल्हा काँग्रेसच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकरिता उमेदवार चाचपणीला सुरुवात

70

– जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषद इच्छुक उमेदवारांणी 9 ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याचे महेंद्र ब्राम्हणवाडे यांचे आवाहन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्हा परिषद, पंचायत समित्या व गडचिरोली आणि वडसा नगरपरिषदेची मुदत मार्च महिन्यात संपली असून, प्रशासकाच्या माध्यमातून कामकाज सुरू आहे.
सद्या राज्यात भाजप आणि शिवसेना बंडखोर गटाचे सरकार स्थापन झाल्यामुळे शासनाकडून मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
नुकताच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांचे आरक्षण जाहीर झाले असून त्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या उमेदवारीसाठी चाचपणी सुरू झाली आहे.
सदर निवडणूका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता लक्ष्यात घेता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशानुसार काँग्रेसने उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. इच्छुकांनी निवडणूक अर्जाचा नमुना 9 ऑगस्टपूर्वी काँग्रेस कार्यालयातून घेण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले आहे.