भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांच्या निवासस्थानी ‘मन की बात’ कार्यक्रम

61

– पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांचा ‘मन की बात’ च्या माध्यमातून जनतेशी संवाद

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : देशाचे पंतप्रधान मा. नरेन्द्रजी मोदी साहेब ‘मन की बात’ च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना भारत देशाला स्वतंत्र मिळून ७५ वर्षे होत आहेत. १५ ऑगष्ट हा ७५ वा ऐतिहासिक दिवस असुन स्वतंत्रता अमृत महोत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे. “हर घर तिरंगा झेंडा” हा उपक्रम घेण्यात येत आहे. तसेच शेतकरी बांधवांनसाठी कृषी विभागाची माहिती, मानवी आरोग्य निरोगी रहावे याकरिता आयुर्वेदची माहिती तसेच भारताने क्रीडा क्षेत्रामध्ये केलेली भरीव कामगिरी तसेच इतर विषयावर संवाद साधला असून गडचिरोली जिल्ह्यात सुध्दा तालुका स्तरावर, शहरात, प्रत्येक बुथवर कार्यक्रम घेण्यात आले. आज भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांच्या निवासस्थानी भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे व माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘मन की बात’ कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी कुनघाडकर, पुनम हेमके, दर्शीता पिपरे, हेमंत नंदनवार, रश्मी खरकाटे, जोत्स्ना मुरमुरवार, रिंकु मेश्राम, सुनील कोतकोंडावार, भाजपा पदाधिकारी, शक्तिकेंद्र प्रमुख, बुथ प्रमुख तसेच भाजपा कार्यकर्ते ‘मन की बात’ कार्यक्रमाला उपस्थित होते.