२६ जुलैला व्याहाड (खुर्द) येथे सावंगी मेघे व रोल संस्था यांच्या वतीने सर्व रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन

50

– स्वामी विवेकानंद कॉन्व्हेंट व्याहाड (खुर्द) येथे सकाळी ९ वाजतापासून दु. २ वाजेपर्यंत करण्यात येणार रुग्णांची नोंदणी

– या मोफत उपचार शिबिराचा लाभ घेण्याचे आयोजकांचे आवाहन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) व द रिसर्च ऑर्गनायझेशन फॉर लिविंग इन्हान्समेंट अहेरी (रोल) च्या संयुक्त विद्यमाने सर्व रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन स्वामी विवेकानंद कॉन्व्हेंट व्याहाड (खुर्द) येथे दिनांक २६ जुलै २०२२ रोजी करण्यात आले असून रुग्णालयाच्या खर्चात सवलत देणारे हे शिबिर असल्याने या शिबिराचा लाभ अधिकाधिक रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

या शिबिराचे आयोजन डॉक्टर अभ्युदय मेघे विशेष कार्यकारी अधिकारी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे, डॉक्टर धीरज पटेल अध्यक्ष रोल संस्था अहेरी, डॉक्टर सुरेशजी डोळे सचिव रोल संस्था अहेरी तसेच डॉक्टर अमित बाटवे, स्वामी विवेकानंद चल चिकित्सालय संचालक व्याहाड यांनी केले असून ग्रामीण परिसरातील रुग्णांना पुढील उपचारासाठी या शिबिराचा लाभ मिळावा या हेतूने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराला येणाऱ्या रुग्णांची नोंद सकाळी ९ ते दुपारी २ वाजता पर्यंत करण्यात येणार असून शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या रोगांची तपासणी करण्यात येणार आहे. या शिबिराला विविध वैद्यकीय तज्ञ उपस्थित राहणार असून त्यांच्या तपासणीच्या आधारावर पुढील उपचारासाठी रुग्णांना रुग्णालयात पाठवून विविध शासकिय योजनांच्या माध्यमातून मोफत उपचार केले जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.