राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार श्री. विजय वडेट्टीवार २३ व २४ जुलै २०२२ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर

120

– जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार श्री. विजय वडेट्टीवार २३ व २४ जुलै २०२२ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात शनिवार दि. २३ जुलै २०२२ रोजी सकाळी ९.00 वाजता पत्रकार परिषद (स्थळ – रानफुल निवास गडचिरोली), सकाळी ९.३० वाजता गडचिरोली येथून अहेरीकडे प्रयाण, सकाळी ११.३० वाजता अहेरी येथे आगमन व ग्रामीण काँग्रेस पदाधिकारी तसेच महिला काँग्रेस पदाधिकारी तथा प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत तालुक्यातील पूरपरिस्थितीमुळे झालेले शेतीचे नुकसान व पूरग्रस्त भागाची पाहणी व चर्चा (स्थळ – शासकीय विश्रामगृह आलापल्ली), दुपारी १.०० वाजता अहेरी वरून कागजनगर मार्गे सिरोंच्या जि. गडचिरोलीकडे प्रयाण, सायं. ४.०० वाजता सिरोंचा येथे आगमन व तालुक्यातील पूरपरिस्थितीमुळे झालेले शेतीचे नुकसान व पूरग्रस्त भागाची पाहणी, सायंकाळी ६.०० वाजता सिरोंचा जि. गडचिरोली येथे आगमन व मुक्काम.

रविवार दि. २४ जुलै २०२२ रोजी सकाळी ९.०० वाजता ग्रामीण जिल्हा व महिला काँग्रेस पदाधिकारीच्या वतीने सिरोंचा तालुक्यातील पूरग्रस्त नागरिकांना अन्नधान्य कीट व ब्लॅंकेटचे वाटप, दुपारी १२.०० वाजता सिरोंचावरून चामोर्शी जि. गडचिरोलीकडे प्रयाण, दुपारी ३.३० वाजता चामोर्शी जि. गडचिरोली येथे आगमन व राखीव. सायंकाळी ४.०० वाजता चामोर्शी तालुक्यात अतिवृष्टीमुळे घरांची झालेली पडझड व पूर परिस्थितीमुळे झालेले शेतीचे नुकसान तसेच पूरपरिस्थिती संदर्भात ग्रामीण काँग्रेस पदाधिकारी व महिला पदाधिकारी यांच्याशी चर्चा. सायंकाळी ६.०० वाजता चामोर्शी येथून गडचिरोलीकडे प्रयाण, सायंकाळी ७.०० वाजता गडचिरोली येथे आगमन व मुक्काम
(स्थळ – रानफुल निवास गडचिरोली) करणार आहेत.