महराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव डॉ. नामदेव किरसान आणि मित्र परिवाच्या वतीने पूरग्रस्तांना अन्यधान्य किटचे वितरण

92

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव डॉ. नामदेव किरसान यांनी आपल्या वाढदिवसानिमित्ताने जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात १ लक्ष रुपयांंचे अन्यधान्य किटचे वितरण करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज अहेरी तालुक्यातील पूरग्रस्त भागात गरजूंना अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंनी तयार केलेल्या किटचे वितरण करण्यात आले. अन्यधान्य वितरण गाडीला गडचिरोली शहर काँँग्रेस अध्यक्ष सतीश विधाते, रजनीकांत मोटघरे, नंदू वाईलकर, जितेंद्र मुनघाटे, अजय लोंढे, घनशाम वाढई, भूषण कुनघाडकर यांनी हिरवी झेंडी दाखवली.

अहेरी तालुक्यातील अहेरी आणि अलापल्लली येथे अन्यधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. यावेळी अन्यधान्य व जिवनावश्यक वस्तुंचे वितरण करताना अहेरी तालुका कॉंग्रेस अध्यक्ष मुस्तक हकीम, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष रझाक पठाण, एटापल्ली नगरपंचायतचे नगरसेवक किसन हिचामी, नगरसेवक निजान पेंदाम, एटापल्ली युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष मोहन नामेवार, आलापल्ली शहर अध्यक्ष रुपेश बंदेला, तालुका काँग्रेस सोशल मिडीया प्रमुख सतिष मडावी, शाकिर भाई, सतिष चेरलावार, विलास शेंडे, आनंद रामगिरवार, संतोष वसाके, अशोक मडावी, देऊ पुंंगाटी सह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.