भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराच्या वतीने स्नेहनगर येथे वृक्षारोपण

106

– खासदार अशोकजी नेते यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण तसेच विविध कार्यक्रमांंचे आयोजन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली–दि.०१ जुलै*

गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार मा. अशोकजी नेते यांच्या वाढदिवसानिमित्त 1 जुलै रोजी भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराच्या वतीने वृक्षारोपण, फळवाटप व विविध कार्यक्रमांंचे आयोजन करण्यात आले होते.
शहरातील स्नेहनगर येथील ओपन स्पेसमध्ये खासदार अशोकजी नेते, जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, जिल्हा संघटन मंत्री रवींद्र ओल्लारवार, एस. टी. मोर्चा प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम, माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच महिला व बाल रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप, वृद्धाश्रमातील वृद्ध नागरिकांना शाल वाटप करण्यात आले.
तत्पुर्वी खासदार अशोकजी नेते यांना पुष्पगुच्छ देवुन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. वरील सर्व कार्यक्रमाला माजी न. प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, महिला आघाडी शहर अध्यक्ष कविता उरकुडे, शहर महामंत्री केशव निंबोड, विनोद देवोजवार, युवा मोर्चा शहर महामंत्री हर्षल गेडाम, सुभाष उप्पलवार, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, लता लाटकर, नीता उंदीरवाडे, रोशनी बानमारे, निलिमा राऊत, पुनम हेमके, कोमल बारसागडे, ज्योती बागडे, राजू शेरकी, देवाजी लाटकर, विलास नैताम तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.