खा. अशोकजी नेते यांच्या वाढदिवसानिमित्त 1 जुलै रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन

64

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या, 1 जुलै रोजी गडचिरोली शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी 9 वाजता सेमाना देवस्थान येथे वृक्षारोपण, सकाळी 11 वाजता भाजपा जनसंपर्क कार्यालयात शुभेच्छांचा स्वीकार कार्यक्रम, सकाळी 11.30 वाजता गडचिरोली नगर परिषद येथे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळात कोविड – 19 लॉकडाऊनमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमांना भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व हितचिंतकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.