भाजपा गडचिरोली शहर अध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे यांच्या वाढदिवसानिमित्त 1 जुलैला विविध कार्यक्रमांचे आयोजन

93

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भाजपा गडचिरोली शहर अध्यक्ष तथा नगर परिषद गडचिरोलीचे माजी पाणी पुरवठा सभापती मुक्तेश्वरजी काटवे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या, 1 जुलै रोजी गडचिरोली शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दुपारी 2 स्थानिक इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृहात केक कापून शुभेच्छा देण्यात येणार आहेत. त्यानंतर हनुमान वॉर्डातील संजय गांधी नगर परिषद शाळेत वृक्षारोपण व मुलांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन मित्र परिवारातर्फे करण्यात येत आहे.