माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते वेलगुर टोला येथील माता मंदिराचे उद्घाटन

82

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील ग्रा. पंं. किस्टापूर अंतर्गत येत असलेल्या वेलगुर टोला येथे माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते माता मंदिराचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले.
वेलगुर टोला येथे माता मंदिर नसल्याने प्रत्येक वर्गातील समाजबांधवांना अडचण भासत होती. गावात माता मंदिर होते. मात्र लाकडापासून तयार केले होते. प्रत्येक व्ययक्तिक कार्यक्रम असेल, सण उत्सव असो किंवा सामाजिक कार्यक्रम असोत सर्वप्रथम माता मंदिरात जावून पूजा अर्चना करूनच बाकीचे कार्यक्रम पार पाडत असतात. मात्र माता मंदिर व्यवस्थित नसल्याने वेलगुर टोला येथील सर्व समाज बांधवांनी गावात बैठक घेवून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे माता मंदिर बांधकाम करण्याकरिता निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली असता कंकडालवार यांनी माता मंदिर बांधकाम करण्यासाटी निधी प्राप्त होत नाही. मात्र मी माझ्या स्वखर्चाने माता मंदिर बांधून देतो अशी ग्वाही दिली व सदर बांधकाम पूर्ण झाले असल्याने आज माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते पूजा अर्चना करून रितसर उद्घाटन करण्यात आले.
यावेळी वाद्य वाजवत कंकडालवार यांचे स्वागत करण्यात आले व मंदिर उद्घाटनाकरिता वाद्य वाजवत मिरवणूक काढून मंदिराकडे प्रस्थान करण्यात आले व रीतसर पूजा करून उद्घाटन करण्यात आले.

यावेळी पंचायत समितीच्या माजी उपसभापती संगीताताई चांदुरकर, वेलगुर ग्रामपंचायतचे सरपंच किशोर आत्राम, उपसरपंच उमेश मोरे, ग्रामपंचायत वेलगूरचे माजी सरपंच अशोक येलमुले, ग्रामपंचायत सदस्य योगिता करपेत, मयुरी तलांडे, राधिका सडमेक, नरेश मडावी, सुरेश येरमे, बंडू सिडाम, यास्वंत सिडाम, राजू येरमे, सुरेखाताई येरमे, किशोर करपेत, करपेत काकू, विनोद तलांडे, अनिल दबा आणि गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.