रक्तदान हे मानवतेसाठी समर्पणाचे उत्कृष्ट कार्य – खा. अशोक नेते

112

– देसाईगंज (वडसा) येथे संत निरंकारी मंडळाचे भव्य रक्तदान शिबिर

– 153 पुरुष व 17 महिला असे एकूण 170 युनिट रक्तदान

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : रक्तदान हे मानवतेसाठी समर्पणाचे उत्कृष्ट कार्य आहे. संत निरंकारी मिशनद्वारे जगभरात मानव कल्याणासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करून भाविकांद्वारे केल्या जात असलेले रक्तदानाचे कार्य महान आहे. त्यासाठी मी संत निरंकारी मिशनचे अभिनंदन करीत असल्याचे प्रतिपादन खा. अशोक नेते यांनी केले.

संत निरंकारी मंडळ शाखा देसाईगंज (वडसा) च्या वतीने 10 जून 2022 रोजी संत निरंकारी सत्संग भवन आरमोरी रोड देसाईगंज वडसा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात 153 पुरुष व 17 महिला असे एकूण 170 लोकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. रक्तपेढी जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे रक्ताची टंचाई निर्माण झाल्यामुळे त्यांनी मंडळाला रक्तदान शिबिरासाठी विनंती करताच मंडळाद्वारे मानवतेसाठी तातडीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते संत निरंकारी मंडळाचे झोनल इंचार्ज श्री. किसन नागदेवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. त्याप्रसंगी खा. नेते बोलत होते. यावेळी वडसा शाखा संयोजक श्री. आसाराम निरंकारी, सेवादल क्षेत्रीय संचालक श्री. हरीष निरंकारी, न. प. देसाईगंजचे माजी उपाध्यक्ष श्री. मोतीलाल कुकरेजा, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. किशोर ताराम, माजी जि. प. सभापती रोशनी पारधी, रेवता अलोने, अर्चना ढोरे, मोहन गायकवाड, सुनील पारधी, चांगदेव फाये आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी खा. नेते यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
शिबिराला देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार आश्रमा यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांच्या हस्ते सुद्धा रक्तदात्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. कार्यक्रमात अध्यक्षीय मार्गदर्शन करताना झोनल इंचार्ज श्री किसन नागदेवे यांनी संत निरंकारी मंडळाद्वारे गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली येथे संपन्न झालेल्या व पुढे चामोर्शी, आष्टी, कुरखेडा, मालेवाडा इत्यादी शाळेमधील प्रस्तावित रक्तदान शिबिराची माहिती दिली सर्वांच्या सहकार्याबद्दल मंडळातर्फे आभार व्यक्त केले.

रक्त संकलनासाठी रक्तपेढी सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील चमू डॉ. किशोर ताराम, डॉ. अशोक तुमरेडी, सतीश तडकलावार, स्वप्नील चाफले, मोहिनी चुटे, पंकज निखाडे, श्री. प्रफुल, समता खोब्रागडे, सुरज चांदेवार, गायत्री, पूजा, ग्रिष्मा, प्रमोद देशमुख, जीवन गेडाम, वसंत नान्हे, बंडू कुंभारे तसेच रक्त केंद्र उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथील चमू डॉ. रवींद्र वाटोरे, निखिलकुमार चोंडापर्ती, व्यंकटस्वामी तोटावार, शरद बांबोळे, संदीप डेकाटे, वृषाली देवदास परचाके, निकिता मोहन आत्राम, अर्चना इंदरशहा आत्राम, मेहराज शेख यांनी विशेष परिश्रम घेतले. रक्तदान शिबिराला यशस्वी करण्यासाठी सेवादलाचे सर्व पुरुष- स्त्री सदस्यांनी गणवेशात परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. हरीष निरंकारी, संचालन श्री. नानक कुकरेजा यांनी तर आभार प्रदर्शन श्री. पुरुषोत्तम डेंगानी यांनी केले. रक्तदानासाठी उत्तम व्यवस्था करण्यात आलेली होती. शिबिराला यशस्वी करण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल झोनल इंचार्ज श्री किसन नागदेवे व संत निरंकारी मंडळ वडसा शाखेने सर्वांचे आभार व्यक्त केले आहे.