रोपवन संरक्षक मजुरांंची मजुरी त्वरित द्या : खा. अशोक नेते यांच्याकडे भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष चांगदेव फाये मागणी

133

– रोपवन संरक्षक मजुरांचे दोन वर्षांंपासून मजुरी प्रलंबित

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : दोन वर्षांंपासून वनविभागाकडे प्रलंबित असलेल्या वन मजुरांची मजुरी मिळत असल्याने वन मजूर आर्थिक संकटात सापडले असून वनमजुरांंनी आपल्या हक्काच्या मजुरी करता धावपळ करीत असून अघापही प्रश्न निकाली निघाला नाही नाही. त्यामुळे भारतीय जनता युवा मोचाचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये यांनी खासदार अशोकराव नेते यांना वनहक्क वनमजुरांची आपबिती सांगून निवेदनाद्वारे सादर केले व वनमजुरांची मजुरी तत्काळ मिळवून देण्याकरिता पाठपुरावा करावा, अशी मागणी चांगदेव फाये यांनी केली आहे. यावेळी खासदार अशोकजी नेते यांनी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
कुरखेडा परिक्षेत्राअंतर्गत गोठणगाव- कुरखेडा उपक्षेत्रात ग्रीन इंडिया मिशन योजनेअंतर्गत सन 2019 -20 मध्ये रोपवन घेण्यात आले होते. सदर रोपवनात मजुरांकडून रोपवनाची कामे करून घेण्यात आली आहेत. माञ जवळपास शेकडो मजुरांची लाखो रुपये मजुरी देण्यात आले नाही. प्रथम वर्षी झालेले निंदणी कामे मरअळ भरणे, रोपवन संरक्षण इत्यादी कामाची मजुरी अद्यापपर्यंत वाटप करण्यात आली नाही. वनविभागाकडून सदर कामाची धनादेश मागणीद्वारे वारंवार मागणी नोंदवण्यात आली असून सुद्धा मजुरांची मजुरी निधी उपलब्ध झालेला नाही. हे कारण पुढे करून मजुरांंची आर्थिक अडचणी दूर केल्या जात नसल्याचे दिसत आहे. सदर कामे करुन दोन वर्ष पूर्ण झालेले आहे. झालेल्या कामाची मजुरी मिळविण्याकरिता मजूर सारखे वनविभागाकडे चकरा मारत आहेत. परंतु दोन वर्षांंपासून प्राप्त झाली नाही. त्यामुळे मजुरांना मजुरी तत्काळ वितरीत करण्याचे आश्वासन अनेकदा देण्यात आले होते. परंतु अजूनपर्यंत मजुरांना मजुरी मिळाली नाही. त्यामुळे उपोषणाला बसण्याची तयारी मजुरांनी दर्शवली.
मागिल दोन वर्षांंपासून वनविभागाकडे वनमजुरांची मजुरी प्रलंबित असल्याने वनमजुरांवर आर्थिक अडचणी निर्माण झाली असून वनमजूर आर्थिक संकटात सापडले आहेत. यामुळे काही दिवसापुर्वी कुरखेडा येथील वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर रखरखत्या उन्हात वनमजुर उपोषणाला बसले. या उपोषण आंदोलनात उपविभागीय वन अधिकारी एम. एन. चव्हाण व वनपरिक्षेत्र अधिकारी कुंभलकर यांनी शासनस्तरावरून हा प्रश्न रखडलेला असून शासन स्तरावर निधी उपलब्ध नसल्याने खात्यावर जमा करण्यात आली नाही. निधी आल्यानंतर लगेच आपल्या खात्यात पैसे टाकल्या जाईल. तुमच्या प्रलंबित असलेल्या मजुरीचा पाठपुरावा आम्ही शासन स्तरावर केला आहे, असे लिखित आश्वासन उपविभागीय वन अधिकारी एम. एन. चव्हाण व वनपरिक्षेत्र अधिकारी एम. डी. कुंभलकर यांनी दिल्यानंतर उपोषणकर्त्याने उपोषण मागे घेतले होते. पंरतु अघापही प्रश्न निकाली निघाला नाही.

या मजुरांच्या उपोषण मंडपाला भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये यांनी भेट देऊन मजुरांच्या व्यथा समजून घेतल्या व मजुरांच्या मागण्या रास्त असून त्यांच्या मागण्या त्वरित पूर्ण करण्यात यावे याकरिता पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले त्या दृष्टिकोनातून आज दिनांक ९ जूनला चांगदेव फाये यांनी खासदार अशोक नेते यांना भेटुन सदर समस्या सांगितले व निवेदन सादर केले
खासदार अशोकजी नेते यांनी आपण संबंधित विभागाकडे पाठपुरावा करणार, असा आश्वासन दिले.
यावेळी भाजयुमो जिल्हा अध्यक्ष चांगदेव फाये यांच्यासह चामोर्शी तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे व कार्यकर्ते उपस्थित होते.