– मेडिकल कॉलेज रद्द करून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल करण्याचा प्रयत्न म्हणजे हॉस्पिटलच्या नावावर पैसे खाण्याचा डाव असल्याचा आमदार डॉ. देवरावजी होळी यांंचा आरोप
– कॉलेज रद्द करण्याचा निर्णय मागे घ्या अन्यथा मोठे आंदोलन करणार
– गडचिरोली जिल्ह्यातील जनतेचा फार मोठा विश्वासघात
– जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन विरोध करण्याची आवश्यकता
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली येथे मंजुर करण्यात आलेले मेडीकल कॉलेज केवळ आपल्या आर्थिक स्वार्थासाठी रद्द करून राज्य सरकारने जिल्ह्यातील लोकांचा फार मोठा विश्वासघात केला असून मेडिकल कॉलेज रद्द करून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल करण्याचा प्रयत्न म्हणजे हॉस्पिटलच्या नावावर पैसे खाण्याचा मोठा डाव असल्याचा आरोप आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी केला असून कॉलेज रद्द करण्याचा निर्णय मागे न घेतल्यास मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्ह्यातील सर्व पक्षीय लोकांनी एकत्र येण्याची गरज असून राज्य सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात आंदोलन करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
मेडीकल कॉलेज रद्द करून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी प्रशासनाने, जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जिल्हयातील जनतेला विश्वासात घेतले नाही. हा जिल्ह्यातील जनतेचा फार मोठा विश्वासघात केला आहे.
प्रथमतः जिल्ह्यात मेडीकल कॉलेजची अत्यंत आवश्यकता आहे. त्यानंतर शासनाला वाटेल तर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल द्यावे. मात्र मंजुर झालेले कॉलेज रद्द करून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणे म्हणजे जिल्हयातील लोकांची फसवणूक केली असल्याचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी म्हटले केले.