महाविकास आघाडी राज्यसरकारच्या नाकर्तेपणामुळे गेले राज्यातील ओबीसींंचे राजकीय आरक्षण : खा. अशोकजी नेते

148

विदर्भ क्रांती न्यूज

चंद्रपूर : भारतीय जनता पार्टी तथा भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा चंद्रपूरतर्फे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपाचा चक्काजाम आंदोलन व्याहाड खुर्द या ठिकाणी घेण्यात आले. त्याप्रसंगी महाभकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसीचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले, असे प्रतिपादन खा. अशोकजी नेते यांनी केले.
राज्य सरकारने एम्पिरिकल डाटा सादर न केल्याने, ट्रिपल टेस्ट करून सुद्धा मागासवर्गीय आयोग स्थापन करू शकले. त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसी आरक्षण टिकले नाही. याला संपूर्ण जबाबदार महाभकास आघाडी राज्यसरकार आहे.
ओबीसी समाजावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात व्याहाड खुर्द येथील बस स्टॉपवर धरणे आंदोलन करुन भाजपाच्या चक्काजाम आंदोलनाप्रसंगी खा. अशोकजी नेते प्रतिपादन केले.
भाजपा ओबीसी मोर्चा चंद्रपूरच्या वतीने व्याहाड खुर्द येथे राज्य सरकारने ओबीसींचा राजकीय आरक्षण संपुष्टात आणल्याने महाराष्ट्रातील महाभकास सरकारच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व खा. अशोकजी नेते, देवरावजी भोंगळे जिल्हा अध्यक्ष भाजपा चंद्रपुर तसेच अविनाश पाल जिल्हाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा चंद्रपुर तथा तालुकाध्यक्ष भाजपा सावली, नामदेव डाहुले भाजपा जिल्हा महामंत्री यांच्या नेतृत्वात करण्यात आले. त्यावेळी आंदोलनात सतिश बोमावार, अर्जुन भोयर, कविंद्र रोहणकर, अंकुश भोपये, विनोद धोटे, गणपत कोठारे, किशोर वाकुडकर, जितेंद्र सोनटक्के, मुकेश भुरसे, नरेश बाबनवाडे, डियज आभारे, अरुण पाल, कुनघाडकर, निलम सुरमवार, छायाताई शेंडे, मनिषा चिमुरकर, शोभाताई बाबनवाडे, प्रतिभाताई बोबाटे, गिरीश चिमुरकर, देवानंद पाल, जितेंद्र मस्के, अशोक ठिकरे, मनोहर गेडाम, प्रविण देशमुख, अरविंद निकेसर, अनिल भुरसे, बाबुराव वासेकर, दिवाकर गेडाम, रवि बांबोळे, भुषण बारसागडे, ज्ञानदेव हुलके, भास्कर धानफोले आदी मान्यवर उपस्थित होते.