कमलापूर येथील हत्तींचे गुजरात राज्यात होणारे स्थलांतरण थांबवावे अन्यथा तीव्र आंदोनल करण्याचा माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा इशारा

94

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : कमलापूर हत्ती कॅम्प येथील हत्तींचे गुजरात राज्यात होणारे स्थलांतरण थांबवावे अन्यथा तीव्र आंदोनल करण्याचा इशारा माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दिला आहे. गडचिरोली जिल्हयातील कमलापूर येथील हत्ती कॅम्प हे प्रमुख आकर्षनाचा बिंदू आहे. केवळ गडचिरोली जिल्हयातीलच नव्हे तर चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, नागपूर पासून ते तेलंगना राज्यातील विविध पर्यटक नैसर्गिक अधिवासात हत्ती बघण्याकरिता कमलापूर हत्ती कॅम्प येथे दरवर्षी येतात.
आपला गडचिरोली जिल्हा 76 टक्के बनाने व्यापलेला असल्याने विविध प्रकार ची झाडे, वन औषधी, वनस्पती, प्राणी, पक्षी आढळून येतात व निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी फक्त आपल्या गडचिरोली जिल्हयातीलच नाही तर राज्यातील विविध भागातुन व इतर राज्यातून सुध्दा पर्यटनस्थळ म्हणून कमलापूर हत्ती कॅम्पला भेट देतात.

दरवर्षी पर्यटकांची कमलापूर हत्ती कॅम्पला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत असताना कमलापूर येथील हत्ती व ताडोबामधील हत्ती गुजरात राज्यात स्थलांतरीत करणे हे एक प्रकारे हत्ती या प्राण्यावर अन्याय करण्यासारखे आहे. ज्यामुळे पर्यटनास येणाऱ्या असंख्य पर्यटकांचा तसेच वन्यजीव प्रेमींचा नावारुपास आलेल्या कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये भेट देण्यास येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवर परिणाम होऊन पर्यटकांची संख्या कमी होऊ शकते. महाराष्ट्र राज्यातील एकमेव असलेल्या कमलापुर येथील हत्तींची गुजरात राज्यामध्ये स्थलांतरणाची प्रक्रीया लवकरात लवकर थांबवावी व कमलापूर हत्ती कॅम्पमधील हत्तींना योग्य न्याय देण्यात यावा. नाहीतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कंकडालावर यांनी दिला आहे.