घोट येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : आमदार डॉ. देवराव होळी

314

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : घोट येथील जवाहर नवोदय विद्यालय येथे गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी सदिच्छा भेट दिली व येथील सविस्तर माहिती जाणून घेतली. येथील प्राचार्य नागेश्वर राव यांचे सोबत सविस्तर चर्चा केली. यावेळी प्रामुख्याने जवाहर नवोदय विद्यालय येथे करण्यात आलेल्या विविध बांधकाम व विकासात्मक कामाबद्दल माहिती घेतली.
यावेळी प्रलंबित असलेल्या विषयाबाबत आमदार डॉ. होळी यांनी माहिती जाणून घेतली.
यावेळी प्रामुख्याने जवाहर नवोदय विद्यालयाकरिता हस्तांतरण करण्यात आलेल्या जागेच्या संदर्भात अनेक माहिती मिळाली. यावेळी जवाहर नवोदय विद्यालयाच्या विस्तारीकरण करण्यासाठी वनविभागाची ना हरकत परवानगी पत्र अजूनही न मिळाल्याची माहिती समोर आली व सदर ना हरकत प्रमाणपत्र आमदार डॉ. देवराव होळी यांनी स्वतः मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी आमदार डॉ. होळी यांनी वारंवार भेट देऊन येथील विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालक बांधव यांची समस्या जाणून घेतल्या. याबद्दल आमदार डॉ. होळी यांचा प्राचार्य नागेश्वर राव यांनी सत्कार केला.
सत्काराला उत्तर देताना आमदार डॉ. होळी यांनी सांगितले, जवाहर नवोदय विद्यालय येथील समस्त समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबध्द आहोत, असे आश्वासन दिले.