12 लाखांचे बक्षिस असलेल्या 2 जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

238

– टीसीओसी कालावधीच्या पाश्र्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलास मोठे यश

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : शासनाने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकीत माओवाद्यांंचा झालेला खात्मा तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे माओवादी मोठ्या संख्येने आत्मसमर्पण करीत आहेत. नुकतेच 12 लाख रुपये बक्षीस असलेले नक्षलवादी नामे कोलु ऊर्फ विकास ऊर्फ सुकांत विनोद पदा, वय 27 वर्ष रा. वक्कुर, पोस्टे कोयलीबेडा, ता. आरेच्छा जि. नारायणपूर (छ. ग.) व राजे ऊर्फ डेबो जैराम उसेंडी वय 30 वर्ष रा. जवेली (बु.) ता. एटापल्ली जि. गडचिरोली या दोन जहाल नक्षलवाद्यांनी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या समोर आत्मसमर्पण केले.
आत्मसमर्पीत सदस्यांंबाबत माहिती
नामे- कोलु ऊर्फ विकास ऊर्फ सुकांत विनोद पदा

दलममधील कार्यकाळ
1) कोलु पदा हा माहे सप्टेंबर 2010 रोजी प्रतापपूर दलम सदस्य पदावर भरती झाला होता.
2) माहे नोव्हेंबर 2011 ते सन 2017 पर्यंत तो सीसीएम सुधाकर याचे सुरक्षा गार्ड म्हणुन कार्यरत होता.
3) त्यानंतर माहे- जुलै 2017 ते डिसेंबर 2021 पर्यंत कंपनी क्र. 10 मध्ये तो सेक्शन कमांडर पदावर कार्यरत होता.
कार्यकाळात केलेले गुन्हे

1) कोलु पदा याचेवर 03 खून, 07 चकमक, 01 दरोडा असे एकुण 11 गुन्हे दाखल आहेत.
2) नक्षलमध्ये कार्यरत असतांना त्याने विविध ठिकाणी 03 अॅम्बुश लावले होते.
3) त्याने लावलेल्या छत्तीसगडमधील मौजा अवालवरसे (छ.ग.) महाराष्ट्रामधील मौजा झारेवाडा, पोयारकोठी, अॅम्बुशमध्ये व ओडीसामधील मौजा गुंडापूरी, कंजेनझरी, चुरामेट्टा या चकमकीमध्ये त्याचा सहभाग होता.
4) त्याने लावलेल्या अॅम्बुशमध्ये सन- 2020 रोजी गडचिरोली जिल्ह्रातील पोमके कोठी हद्दीतील मौजा पोयारकोठी जंगल परिसरात 1 पोलीस अधिकारी व 01 पोलीस जवान शहीद झाले होते.

नामे- राजे ऊर्फ डेबो जैराम उसेंडी

दलममधील कार्यकाळ

1) माहे- फेब्राुवारी 2011 मध्ये कसनसूर दलम सदस्य पदावर भरती झाली होती.
2) माहे- सप्टेंबर 2012 ते माहे डिसेंबर 2021 पर्यंत कंपनी क्र. 10 मध्ये सदस्य पदावर कार्यरत होती.
3) गडचिरोली जिल्ह्रातील पोमके कोठी हद्दीतील मौजा पोयारकोठी जंगल परिसरात लावलेल्या अॅम्बुशमध्ये 1 पोलीस अधिकारी व 01 पोलीस जवान शहीद झाले.

कार्यकाळात केलेले गुन्हे

1) राजे उसेंडी हीचेवर 01 खून, 04 चकमक, 01 जाळपोळ असे एकुण 06 गुन्हे दाखल आहेत.
2) सन- 2019 रोजी मौजा मुसपर्शी येथील साईनाथ तव्वे या इसमाच्या खुनात तिचा सहभाग होता.

आत्मसमर्पीत होण्याची कारणे

1) नक्षल दलममध्ये वरिष्ठ माओवाद्यांकडून महिला व मुले यांना वाईट वागणूक मिळत असल्यामुळे.
2) जंगलामध्ये असंख्य मैलाचा प्रवास पायी करावा लागत असल्यामुळे.
3) जनतेचा नक्षलवाद्यांना पाठींबा मिळत नसल्यामुळे.
4) दलममध्ये अवजड ओझ्याची कामे फक्त महिलांना दिली जातात, त्यांना इतर बाबतीत सहभागी केले जात नाही.
5) दलममध्ये नसबंदी करून पती-पत्नीला इतर दलममध्ये वेगवेगळे ठेवत असल्यामुळे.
6) पोलीस दलाच्या नक्षलविरोधी अभियानामुळे जंगलातील वावर धोकादायक झाल्यामुळे.
7) वरिष्ठ कॅडर व कनिष्ठ कॅडरमध्ये मुलभूत सुविधांसाठी भेदभाव केला जात असल्यामुळे.
8) वरिष्ठ माओवाद्यांकडून वैद्यकीय कारणासाठी पैसे दिले जात नसल्यामुळे.
9) महाराष्ट्र शासनाच्या आत्मसमर्पण योजनेने प्रभावीत होवून आत्मसमर्पण केल्याचे सांगितले.

महाराष्ट्र शासनाने जाहिर केलेले बक्षीस

1) महाराष्ट्र शासनाने कोलु पदा याचेवर 8 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
2) राजे उसेंडी हिचेवर 04 लाख रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते.

आत्मसमर्पणानंतर शासनाकडून मिळणारे बक्षीस

3) आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता शासनाकडुन कोलु पदा यास 3.50 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.
4) आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता शासनाकडुन राजे उसेंडी हीला 2.50 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.
5) पती-पत्नीने एकत्रीत आत्मसमर्पणानंतर अतिरिक्त 1.50 लाख असे एकुण 7.50 लाख रुपये तसेच शासनाच्या इतर योजनेचा लाभ मिळवुन देण्यात येणार आहे.

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे सन 2019 ते 2022 सालामध्ये आतापर्यंत एकुण 47 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून, सन 2022 या चालु वर्षात एकुण 02 जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. विकासकामांना आडकाठी निर्माण करणा­या नक्षलवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा असे आवाहन पोलीस अधीक्षक गडचिरोली अंकित गोयल श यांनी केले आहे.