पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या पुढाकाराने गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला गती : किरण पांडव

110

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आदरणीय ना. एकनाथजी शिंदे साहेब गडचिरोली जिल्ह्यचे पालकमंत्रीपद हाती घेतल्यापासून आपण जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक विकासकामे मार्गी लावली. येथील जनतेच्या मुलभूत सोयीसुविधेचे प्रश्न व अनेक समस्या संवेदनशीलपणे सोडविल्या. त्यामुळे गडचिरोली जिल्हा विकासाच्या पथावर मार्गक्रमण करीत असल्याचेे शिवसेनेचे जिल्हा संघटक किरण पांडव यांनी प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे.

जिल्ह्यातील विकासकामांंबरोबरच गडचिरोली जिल्ह्यातील शिवसेनेच्या पक्ष संघटन बळकटीकरणासाठी आपण विशेष लक्ष दिले व मला जिल्हा संघटकपदाची जबाबदारी सोपविली. आपल्या मार्गदर्शनात मी जिल्ह्यातील दुर्गम भागातील व तळागाळातील शिवसैनिकांसोबत नगरपंचायत निवडणुकीत परिश्रम घेतले. याचेच फलित म्हणून यापूर्वी एकही नगरसेवक नसलेल्या शिवसेनेने समाधानकारक यश संपादन केले. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा नगरपंचायतीवर शिवसेनेचा नगराध्यक्ष विराजमान होणार असून हे मिळालेले यश हे आपले नेतृत्व व मार्गदर्शन आणि शिवसैनिकांनी केलेल्या मेहनतीचे फलित आहे.

मुलचेरा नगरपंचायतीवर फडकलेला शिवसेनेचा भगवा ही माझ्याकडून व समस्त शिवसैनिकांंकडून आपणास वाढदिवसाची गिफ्ट आहे, असेही शिवसेनेचे गडचिरोली जिल्हा संघटक किरण पांडव यांनी म्हटले आहे.