– माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी केले अभिनंदन
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : चंद्रपूर–गडचिरोली–वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपचे अरुण लखानी यांची महाराष्ट्र विधान परिषदेवर बिनविरोध आमदार म्हणून निवड झाली. याबद्दल गडचिरोली – चिमुर लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार तथा भाजपा अनुसुचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
आपल्या प्रदीर्घ सामाजिक, राजकीय व विकासाभिमुख कार्याची ही पावती असून, आपल्या नेतृत्वातून चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास आहे. आपल्या पुढील कार्यकाळासाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देत माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी अरुण लखानी यांचे अभिनंदन केले आहे.







