Home गडचिरोली संत गाडगेबाबांचे विचार आत्मसात करुन समाजाने प्रगती साधावी : विजय गोरडवार

संत गाडगेबाबांचे विचार आत्मसात करुन समाजाने प्रगती साधावी : विजय गोरडवार

36

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागे असलेल्या धोबी समाजाने गाडगेबाबांनी दिलेल्या उपदेशांचा अंगीकार करून समाज संर्वांगिन प्रगती साधावी आणि संघटीत होऊन आपल्या न्याय हक्कासाठी लढण्याची शक्ती निर्माण करावी, असे आवाहन गडचिरोली न. प. चे माजी सभापती विजय गोरडवार यांनी केले.

महाराष्ट्र राज्य परीट, धोबी, वरठी सेवा संघटना जिल्हा गडचिरोलीच्या वतीने सोमवा, २३फेब्रुवारी २०२६ ला संत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीचे आयोजन पटेल मंगल कार्यालय येथे करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन विजय गोरडवार यांच्या हस्ते पार पडले, त्याप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धोबी समाजाचे जिल्हाध्यक्ष संतोष आकनूरवार तर प्रमुख पाहुणे म्हणून सुभाष रोहनकर, दामोधर येम्पल्लीवार, प्रभुदास कुरूडकर, दिवाकर येम्पल्लीवार, रमेश गडपायले, अरुण केळझरकर, महिला जिल्हाध्यक्षा शिल्पा कोल्हटवार, महिला संघटन सचिव लता वरघंटे, सचिव कल्पना चतुरकर, उपाध्यक्षा मंगला केळझरकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी अनेक मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे सचिव मोरेश्वर मानपल्लीवार यांनी तर संचालन सोनाली सुरनकर यांनी केले. यानंतर संत गाडगेबाबांच्या पालखीची शोभायात्रा मोठ्या थाटात शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रविण ताजने, अरविंद मादेश्वार, नेताजी कावळे, अमोल दासरवार, राजु कंठीवार, नितीश केळझरकर, प्रभु रोहनकर, महेश कोतकोंडावार, मानिक केळझरकर, नरेश कावळे, प्रमोद ताडपल्लीवार, किशोर केळझरकर, मयुर दासरवार, प्रकाश राजकोंडावार आदींनी सहकार्य केले.

error: Content is protected !!