घारगावचे उपसरपंच कबीरदास आभारे धावले अपघातग्रस्तांचा मदतीला

13

– दुचाकी अपघातात दोन गंभीर, दोनजण किरकोळ जखमी

– चामोर्शी – मार्कंडादेव मार्गावरील गजानन महाराज मंदिराजवळील घटना

– कबीरदास आभारे यांनी जखमींना केले रुग्णालयात दाखल

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील मोहरली येथील दोघेजण दुचाकीने चामोर्शीवरून जात असताना मार्कंडादेव येथील दोघेजण दुचाकीने चमोर्शीकडे जाणाऱ्या दोन्ही दुचाकीची समोरासमोर धडक बसल्याने झालेल्या अपघातात रघुनाथ आगरे व चंद्रकांत पाल हे दोनजण गंभीर तर भैय्याजी भोयर व रामचंद्र मरस्कोले हे दोनजण किरकोळ जखमी झाल्याची घटना चामोर्शी – मार्कंडादेव रस्त्यावर असलेल्या गजानन महाराज मंदिर ते पॉवर स्टेशन दरम्यान घटना सोमवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली. या अपघाताची माहिती मिळताच चामोर्शी तालुक्यातील घारगाव येथील उपसरपंच कबीरदास आभारे तत्काळ अपघातग्रस्तांचा मदतीला धावून आले. त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.

चामोर्शी तालुक्यातील मोहरली येथील भैय्याजी भोयर (वय ५५) व रघुनाथ आगरे (वय ४५) हे दोघेजण आपल्या दुचाकीने चामोर्शीवरून अंत्यविधीचे साहित्य घेऊन गावाकडे जात होते. त्याचवेळी फोकुर्डी येथील चंद्रप्रकाश पाल (वय ४०) व मार्कंडादेव येथील रामचंद्र मरस्कोले (वय ५५) हे मार्कंडादेव येथून दुचाकीने मार्कंडादेव येथून चामोर्शीकडे जात असताना गजानन महाराज मंदिर ते पॉवर स्टेशन दरम्यान mh ३३u- ८४६९ व mh २९h- ७२९५ या दोन दुचाकीची समोरासमोर धडक बसल्याने अपघात झाला. या अपघातात चारजण जखमी झाले.

या घटनेची माहिती मिळताच घारगाव येथील उपसरपंच कबीरदास आभारे यांनी तत्काळ रुग्णवाहिका घटनास्थळी घेऊन जाऊन त्या जखमींना चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात दाखल करून सामजिक दायित्व पूर्ण केले.

यावेळी मार्कंडादेव येथील राजू मोगरे, उपसरपंच उमाजी जुनघरे, मोहरलीचे पोलीस पाटील दिंगबर चौधरी, मार्कंडादेव येथील पोलीस पाटील आरती आभारे, सेवकराम बोरकुटे, मारोती आगरे उपस्थित होते.

चामोर्शी पोलीस स्टेशनचे एपीआय सुधीर बनसोडे हेही रुग्णालयात जाऊन जखमीची चौकशी केली. त्या जखमींना ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी गडचिरोली येथे रेफर करण्यात आले. घारगाव येथील उपसरपंच कबीरदास आभारे हे नेहमीच सामाजिक कार्यात सहभागी होत असतात. गरीब, गरजू व अडचणीत सापडलेल्या लोकांच्या मदतीला तातडीने धावून जातात. यावेळी सुद्धा अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच ते अपघातग्रस्तांचा मदतीला धावून गेले.