Home गडचिरोली तेली समाजाचे संघटन काळाची गरज : रामदासजी तडस

तेली समाजाचे संघटन काळाची गरज : रामदासजी तडस

88
Oplus_16908288

– महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेची आढावा बैठक संपन्न

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा जिल्हा गडचिरोलीच्या वतीने विदर्भ दौऱ्याच्या अनुषंगाने आपल्या गडचिरोली जिल्ह्यात संताजी भवन सर्वोदय वॉर्ड,आरमोरी रोड गडचिरोली येथे बैठक संपन्न झाली.
यावेळी अध्यक्षीय भाषणात माजी खासदार व प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा यांनी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महाराष्ट्रातील तेली समाजाला एकत्रित करून त्यांचा हक्क आणि अधिकारासाठी गेल्या चार दशकांपासून कार्यरत आहे. जातीनिहाय जनगणनेत स्वतंत्र नोंद ठेवावी. मुंबई येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यां करिता वसतिगृहची सुविधा, शिक्षण व रोजगार आरक्षण देण्यात यावे. श्री. संताजी जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळाला रु.500=00 कोठीच्या निधीची मागणी प्रलंबित आहे. समाजाच्या या मागण्या सोडविण्यासाठी आणि हक्कासाठी लढा तीव्र करणार असल्याचे प्रतिपादन केले. यासाठी समाज संघटन वाढविणे आज काळाची गरज आहे, असे सांगितले.
यावेळी महासचीव डॉ. भूषणजी कर्डिले, कोषाध्यक्ष. नाना शेलार, उद्योग आघाडी प्रदेश अध्यक्ष, पोपटराव गवळी, प्रदेश उपाध्यक्ष. प्रकाश देवतळे, नागपूर विभागीय अध्यक्ष जगदीश वैद्य, नागपूर विभागीय महिला आघाडी उपाध्यक्षा योगिताताई प्रमोदजी पिपरे, माजी. नगराध्यक्ष. न.प. गडचिरोली महाराष्ट्र प्रांतिकचे जिल्हा अध्यक्ष प्रमोदजी पिपरे, संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुणे यांचे सुद्धा मार्गदर्शन लाभले.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत म्हणुन रमेशजी भुरसे जिल्हा संघटक, ज्येष्ठ उपाध्यक्ष प्राचार्य पि. आर. आखरे, जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष लताताई कोलते, विधि आघाडी जिल्हा अध्यक्ष ॲड. पत्रुजी घोंगडे, जिल्हा उपाध्यक्ष गोपीनाथजी चांदेवार, मधुकर भांडेकर, विजय सुपारे, विलासराव सोमणकर, सचिव लालाजी सातपुते, दिलीप चलाख, मनोहर चलाख, रामभाऊ वैद्य, भास्कर बोडणे, मुक्तेश्वर काटवे यांच्यासह मोठ्या संख्येने तेली समाज बांधव उपस्थित होते.

यावेळी  प्रमोदजी पिपरे नुकतेच महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुणे या शिखर संस्थेवर संचालक म्हणुन निवडुन आले. तसेच प्रा. रमेशजी बरसागडे भाजपा जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्यामुळे या दोघांचाही सत्कार समाजाचे भूषण म्हणुन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोदजी पिपरे, संचालन प्रतिभाताई खोब्रागडे तर आभार प्रदर्शन मधुकर भांडेकर यांनी केले.

error: Content is protected !!