महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्याहाड बुज येथे ‘माणूस एक माती’ नाट्यप्रयोगाचे आयोजन

139

– मा. खा. अशोकजी नेते यांनी नाटकाला दिले शुभ संदेश

विदर्भ क्रांती न्यूज

सावली : व्याहाड बुज (ता. सावली, जि. चंद्रपूर) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून तसेच स्व. अनिल अन्नमवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘माणूस एक माती’ या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता.

या नाटकाचे सादरीकरण एकता नाट्य रंगभूमी वडसा यांनी केले असून, साई नाट्यकला मंडळ व्याहाड बुज यांच्या सौजन्याने आयोजन केले.

कार्यक्रमाचे नियोजित उद्घाटक या क्षेत्राचे माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते होते. मात्र मुंबईतील शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणे आवश्यक असल्याने ते या नाटकाच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीत सोशल मीडिया प्रमुख दिवाकर गेडाम यांनी उपस्थितांना त्यांच्या भावना पोहोचवल्या.

दिवाकर गेडाम यांनी सांगितले की, अशोकजी नेते यांचे व्याहाड बुज गावावर विशेष प्रेम असून, त्यांनी या गावाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर केला आहे. त्यांनी नेहमीच गावाच्या प्रगतीसाठी तत्परता दाखवली आहे. मुंबई येथे असल्याने या नाटकाच्या उद्घाटनाला हजर राहता आले नसले तरी या गावासाठी त्यांचे योगदान आणि शुभेच्छा कायम आहेत.

कार्यक्रमाचे उद्घाटन सावली तालुक्यातील राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेते कविंद्रजी रोहनकर यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्याहाड बुज ग्रामपंचायत सरपंच कविताताई बोल्लीवार होत्या. सहउद्घाटक म्हणून माजी पंचायत समिती उपसभापती रविंद्र बोल्लीवार आणि सहअध्यक्ष दिवाकर गेडाम यांनी भूमिका निभावली.

या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्या प्रणिता तोडेवार, ग्रा. प. सदस्या वैशाली निकेसर, ग्रा. प. सदस्या रूपाली करकाडे, पो. पा. प्रकाशजी करकाडे, महिला मोर्चा तालुका उपाध्यक्षा वर्षा गेडाम, निराधार यो. सदस्य पत्रूजी गेडाम, अरविंद निकेसर, सुधाकर म्याकलवार, डॉ. रोकडे, लोमेशजी, लालाजी म्हशाखेत्री, विनोदजी तोडेवार, देवाजी सातपैसे, शालिनीताई अन्नमवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

उपस्थितांनी साई नाट्यकला मंडळाचे अध्यक्ष रामदासजी गेडाम, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर निकोडे, सचिव मुकुंदा कुंभारे, कोषाध्यक्ष बंडूजी निकेसर, रामभाऊ गेडाम, राजू गेडाम यांच्यासह मंडळाचे सदस्य गण यांचे व एकता नाट्य रंगभूमीचे मनःपूर्वक कौतुक केले.

अशोकजी नेते यांचा संदेश

अशोकजी नेते यांनी आपल्या संदेशात म्हटले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन सामाजिक समतेचा संदेश देणारा दिवस आहे. या दिवशी व्याहाड बुजसारख्या गावांमध्ये सामाजिक नाटक हा प्रयोग राबवले हे पाहून मन आनंदित झाले. माझ्या अनुपस्थितीतही तुम्ही हा कार्यक्रम यशस्वी केला, याबद्दल आयोजकांचे आणि गावकऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. तुम्ही सर्वांनी गावाचा विकास आणि प्रगतीसाठी असेच पुढाकार घ्यावे.”

आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांचेही नाटकाला शुभ संदेश

या नाटकाचे नियोजित सहउद्घाटक गडचिरोली विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार डॉ. ‌मिलिंदजी नरोटे सर यांचे ही या नाटकाला शुभ संदेश शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे आयोजन साई नाट्यकला मंडळाच्या वतीने कौतुकास्पद पद्धतीने करण्यात आले. उपस्थितांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.