विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : भाजपा – महायुती गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे अधिकृत उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या प्रचारार्थ गडचिरोली शहर महिला मोर्चा नियोजनात्मक व आढावा बैठक घेण्यात आली.
त्याप्रसंगी महिला पदाधिकाऱ्यांना कामकाज वाटप व प्रचाराचा आढावा घेताना जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांनी बोलले की, महिला पदाधिकाऱ्यांनी शहरातील प्रभाग निहाय कॉर्नर सभेचे आयोजन करणे व सोबतच घरा – घरापर्यंत जाऊन भाजपाचे उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे यांचा परिचय पत्र व स्टिकर पोहोचवून आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कमळ या बोधचिन्ह समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करण्याचे आवाहन जनतेला करावे.
त्यावेळेस गडचिरोली विधानसभा संयोजक प्रमोदजी पिपरे, भाजपा शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीताताई हिंगे व महिला पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.