देसाईगंज येथील 66 महिला व पुरुषांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

106

विदर्भ क्रांती न्यूज

देसाईगंज : भाजप पक्षावर विश्वास ठेवून आणि आमदार कृष्णा गजबे यांनी 10 वर्षात या विधानसभेत अनेक विकासात्मक कामे केली. त्यामुळे पुन्हा तिसऱ्यांदा अशा विकासपुरुष्याची या विधानसभेला गरज असल्याने भाजपा पक्षात प्रवेश करणाऱ्याची संख्या वाढत आहे. देसाईगंज शहरात उपजिल्हा रुग्णालय मंजूर केले, बसस्थानक मंजूर केले, 66 कोटीची पाणीपुरवढा योजना मंजूर केले, तसेंचे राष्ट्रीय महामार्ग मंजूर करून शहरातील अंतर्गत रस्त्याना मागील 10 वर्षात भरपूर निधी आणून शहराचा विकास केला. यामुळे शहरातील शिवाजी वार्डातील 66 महिला व पुरुष्यांनी काल दि. 9/11 ळा भाजपा प्रचार कार्यालयात पक्ष प्रवेश केला.यावेळी सोमी कोहचाडे, देवन सेडमाके, प्रिया कोहचाडे, पौर्णिमा मेश्राम, शशिकला कुलसुंगे, पुष्पा सीडाम, किरण आत्राम, लता कोहचाडे, वनिता सिडाम, आरती कोडापे, तपस्या कुलसुंगे, वंदना दिघोरे, शशिकला कुलसुंगे, माहेश्वरी उईके, शशिकला कुलसुंगे, छाया कोहचाडे, सीमा वलके, मंजुषा आत्राम, रेखा कोहचाडे, संतोष कोहचाडे, श्याम कोवे, संदीप मेश्राम, प्रशांत कुमरे, निखिल कुळसंगे, सुरज गहाणे, अमय कोवे, पिंटू कुलसुंगे आणि इतर 66 यांनी पक्ष प्रवेश केला.

या कार्यक्रमाला लोकसभा समन्वयक किशन नागदेवे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, जिल्हा उपाध्यक्ष राजू जेठानी, भरत जोशी, माजी नगरसेवक नरेश विठ्ठलानी, जिल्हा सचिव भाजपा सचिन वानखेडे, शहराध्यक्ष सचिन खरकाटे, अमोल नाकाडे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन शहर महामंत्री कुलदीप आमले तर आभार भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पारधी यांनी मानले.