(राष्ट्रीय महामंत्री भाजपा ओबीसी मोर्चा)*
– देसाईगंज येथील भाजपा ओबीसी सामाजाच्या बैठकीत ओबीसीसाठी राबविणाऱ्या योजनांची दिली माहिती
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : महाराष्ट्रामध्ये महायुतीचा सरकार तिसऱ्यांदा येणार आहे आणि आरमोरी विधानसभा आपल्याला परत तिसऱ्यांदा जिंकायची आहे. मी आता कृष्णाभाऊला विचारलं की मागच्या वेळेस किती मतांनी जिंकलो ते म्हणाले सतरा हजार मतांनी जिंकलो. यावेळेस लाडक्या बहिणीचा आशीर्वाद आणि ज्या शेतकऱ्यांचा विज बिल माफ करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये मोफत शिक्षण, ओबीसीसाठी वसतिगृह अशा विविध कामे महायुती सरकारनी केलं आहे. अशा सगळ्यांचा आशीर्वाद कृष्णा गजबेला मिळणार आहे आणि पन्नास हजारांपेक्षा जास्त मताधिक्याने आमदार गजबे निवडून जाणार आहेत. परंतु कृष्णाभाऊ निवडून पन्नास हजारांपेक्षा जास्तच्या मताधिक्क्याने जर आपल्याला त्यांना निवडून पाठवायचं असेल तर स्वतःला कृष्णाभाऊ गजबे आहे म्हणून निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री संगलाल गुप्ता यांनी केले.
पुढे बोलताना संगलाल गुप्ता म्हणाले, अनेक योजना ओबीसींचा जसे की मोदी आवास योजनेच्या माध्यमातून १० लाख घरकुल देण्याचे काम महायुतीसरकारने केलं आहे. आम्हाला प्रत्येक ओबीसी बांधवांपर्यंत पोहोचवा लागेल. प्रत्येक गरीब बांधवांपर्यंत पोहोचवा लागेल प्रत्येक आमच्या आदिवासी बंधू भगिनी आणि त्यांना सांगावं लागेल की 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या भुलताबाद काँग्रेसवाल्यांनी दिल्या. आता त्यांच्या भुलताबामुळे आपण बळी जाऊ नका. आता जे आमच्या भगिनींच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणींना १५०० रुपये महिना सुरू आहे. कालच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की परत आमचं महायुतीचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना २१०० महिना देऊ, असा हा निरोप सगळ्या भगिनींपर्यंत जाऊ द्या. विधानसभेतील शेतकऱ्यांना सांगा की तुमच्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी महायुतीचे सरकार या महाराष्ट्रामध्ये येणार आहे. त्यामुळे कृष्णाभाऊ निवडून जाणे महत्त्वाचा आहे. असे करत असताना आपण एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवायची आहे, असे ते म्हणाले.
कोणत्यातरी बांधवांसमोर जातील आदिवासी बांधवांकडे जातील अल्पसंख्यांक बांधवांकडे जातील. वेगवेगळ्या पद्धतीचा संभ्रम आपल्या उमेदवाराबद्दल आपल्या पक्षाबद्दल पसरवतील म्हणून कार्यकर्त्याने सज्ज राहतील आणि रोज शंभर लोकांच्या भेटी घेऊन कृष्णाभाऊंनी दहा वर्षात केलेले विकास कामे त्यांना सांगून महायुती सरकारने कल्याणकारी सुरू केलेल्या योजना आम्ही त्यांना सांगू आणि परत विनंती करून एक बार आमचे कृष्णाभाऊ यांना विधानसभेतून मोठ्या मताधिक्याने निवडून जातील कारण कृष्णाभाऊ निवडून गेले तर निश्चितपणे लालदिवा आपल्या आरमोरीमध्ये येऊ शकतो. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की महाराष्ट्रामध्ये तिसऱ्यांदा निवडून येणारा एक सज्जन सरळ मार्ग चालणारा आणि कुठलाही घमंड नसणारा आमदार कृष्णाभाऊच्या रूपाने आपल्याला सगळ्याला मिळालेला आहे. त्याला तिसऱ्यांदा निवडून आणण्यासाठी आपण सगळ्यांनी अधिकाधिक प्रयत्न करून इथून बारा दिवस निवडणूक मध्ये 100 लोकांपर्यंत जातील. बैठकीत या ठिकाणी बसलेल्या यांनी संकल्प करावा की कमीत कमी रोज शंभर आमच्या लाडक्या बहिणींना भेटतील त्यांना विनंती करतील, सर्व समाजापर्यंत जाऊन आम्ही कृष्णाभाऊंना येणाऱ्या 20 तारखेला जे मतदान होणार आहे. त्या मतदानामध्ये भरघोस मताने नव्हे तर 50 हजारांच्या मताधिक्याने निवडून आणण्याकरिता संकल्प करूया आणि भाजप पक्ष हा निरंतर ओबीसी समजाच्या पाठीशी उभा आहे आणि तो कायम राहणार आहे, असेही ते संगलाल गुप्ता यांनी केले.
देसाईगंज तालुक्यातील शेकडो ओबीसी समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थित भाजपा ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय गाथे, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरड्डीवार, लोकसभा समन्वयक किसनजी नागदेवे, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे, राष्ट्रवादी काँग्रेस नेते युनूस शेख, शिवसेना शिंदे गटाचे नारायणजी धकाते, भाजपा जिल्हा महामंत्री सदानंदजी कुथे, जिल्हा उपाध्यक्ष मोती कुकरेजा, जिल्हा उपाध्यक्ष राजू जेठानी, भाजपा जेष्ठ कार्यकर्ते भरत जोशी, माजी नगसेवक रामकृष्णजी मैंद, माजी महिला व बालकल्याण सभापती जि. प. रोशनी पारधी, माजी नगराध्यक्षा शालू दंडवते, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते मुरलिधरजी सोंदरकर, संतोष गोंधळे, पं. स. माजी सभापती मोहन गायकवाड, तालुका महामंत्री भाजपा वसंता दोनाडकर, योगेश नागतोडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते संजय साळवे, जिल्हा सचिव विलास गोटेफोडे, माजी नगरसेवक दीपक झरकर, नरेश विठ्ठलानी, कृ. उ. बा. स. संचालक हिरु शेंडे, भरतजी जोशी, तालुका उपाध्यक्ष भाजपा शंकर पारधी आणि इतर ओबीसी मान्यवर मंडळी या प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पारधी आभार माजी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे यांनी केले