महायुतीचे उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे यांचा नामांकन दाखल

17
Oplus_131072

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जनसेवेच्या नवीन अध्यायास २८ ऑक्टोबर रोजी गडचिरोली येथील उपविभागीय कार्यालयात गडचिरोली विधानसभेसाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या जनसागरासमवेत महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे यांनी नामांकन दाखल केला.

यावेळी मा. खा. अशोकजी नेते यांच्या जनसंपर्क कार्यालय चामोर्शी रोड, गडचिरोली येथून ढोल ताशांच्या गजरात महारॅली काढण्यात आली. यावेळी आदिवासी नृत्य, बंगाली नृत्य व भजन दिंडी आदी विविध सांस्कृतिक कला सादर केल्या.

Oplus_131072

यावेळी विधान परिषद सदस्य परिणयजी फूके, मा. खा. अशोकजी नेते, भाजपा अनु. जनजाती मोर्चा राष्ट्रीय महामंत्री, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, भाजपा ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे, विधानसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविजी वासेकर, राष्ट्रवादी काँग्रेस युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष लीलाधरजी भरडकर, शिवसेना नेते राजू कावळे, प्रदेश कार्यकारणी सदस्य रवींद्रजी ओल्लारवार, किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, भाजपा जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे, भाजपा जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गिताताई हिंगे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष चंदाताई कोडवते, भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री. अनिलभाऊ पोहनकर, भाजपा शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिलजी तिडके, भाजपा चामोर्शी तालुकाध्यक्ष आनंदजी भांडेकर, भाजपा गडचिरोली तालुकाध्यक्ष विलासजी भांडेकर, भाजपा धानोरा तालुकाध्यक्ष लताताई पुंगाटी, भाजपा धानोरा शहराध्यक्ष सारंगजी साळवे, नगरसेविका न. पं. चामोर्शी रोशनीताई वरगंटे, नगरसेवक चामोर्शी आशिष पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष तथा मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणयजी खुणे, डॉ. भारत खट्टी, जेष्ठ नेते सुधाकरराव येंनगदलवार, जिल्हा सचिव रंजिताताई कोडापे, नंदकिशोर काबरा सहकारी उपस्थित होते.