– सहकारमहर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार यांचे प्रतिपादन
– कुरखेडा येथे आमदार कृष्णा गजबे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन
– काँग्रेस व ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : महायुतीचे सरकार येताच कुरखेडा नगरपंचायतला नगरपरिषदेचा दर्जा मिळवून देण्याकरिता कुरखेडा परिसराला लागून असलेल्या आजूबाजूच्या गावा गावातील नागरिकांसोबत चर्चा करून कुरखेडा नगरपंचायतला नगरपरिषदेचा दर्जा मिळवून देण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करू, असे प्रतिपादन महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे अध्यक्ष सहकारमहर्षी अरविंदजी सावकार पोरेड्डीवार यांनी केले.
ते कुरखेडा येथे भाजप समर्पित महायुतीचे उमेदवार कृष्णा दामाजी गजबे यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित सभेत मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. पुढे बोलताना अरविंद सावकार पोरेड्डीवार यांनी म्हटले की, लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीने महाराष्ट्र व उत्तरप्रदेश राज्यात जातीवाद व संविधान बदलणार हा खोटा नॅरेटिव्ह पसरवत यश प्राप्त केले. मात्र आता त्यांचा खोडसाळ पणा जनतेचा लक्षात आलेला आहे. त्यामुळे येथील विधानसभा व उत्तरप्रदेश येथील पोटनिवडणूकीत जनता त्यांचा खोट्या नॅरेटिव्ह मध्ये अडकणार नाही व महायूतीला घवघवित यश मिळेल असा आशावाद महाराष्ट्र राज्य सहकार विकास महामंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार यानी व्यक्त केला.
कार्यक्रमात प्रमूख अतिथी म्हणून पद्मश्री डॉ. परशुराम खूणे, भाजपा लोकसभा प्रमुख किसन नागदेवे, विधानसभा प्रमुख प्रकाश सावकार पोरेड्डीवार, आमदार कृष्णा गजबे, विधानसभा निरीक्षक श्रीनिवास तेलंगण, भाजपा तालुका अध्यक्ष चांगदेव फाये, शहर विचार मंचाचे अध्यक्ष माधवदास निरंकारी, सहकार बोर्डाचे अध्यक्ष वसंतराव मेश्राम, जिल्हा बैकेचे संचालक खेमनाथ पाटील डोंगरवार, जिल्हा उपाध्यक्ष गणपत सोनकूसरे, अनूसूचित जाति मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अॅड उमेश वालदे, अल्पसंख्यक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष बबलूभाई हूसैनी, ओबीसी जिल्हा महामंत्री रवींद्र गोटेफोडे, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती व्यंकटी नागीलवार, भाजपा शहर अध्यक्ष सागर निरंकारी, राष्ट्रवादी कांग्रेस (अजीत पवार) जिल्हा उपाध्यक्ष अयुब खान, विधानसभा प्रमूख किशोर तलमले, शिंदे सेनेचे ता. अध्यक्ष अनिकेत आकरे, हेमंत पाटील खुणे, माजी जि. प. सदस्य नाजूक पूराम, लता पूंगाटे, गीता कुभरे आदी उपस्थित होते.
यावेळी तालुका भाजपा व पोरेड्डीवार फॅन्स क्लबचा वतीने सहकारमहर्षि अरविंद सावकार पोरेड्डीवार यांची राज्य शाशनाचा वतीने महाराष्ट्र राज्य सहकार विकास महामंडळाचा अध्यक्ष पदावर नियूक्ती करण्यात आल्याने शाल, श्रीफळ व पूष्पगूच्छ देत सत्कार करण्यात आला.
यावेळी आविका सभापती अनीराम बोगा, वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष फागू तुलावी, जेष्ठ नागरिक जयराम उईके, विनोद दोनाडकर, खुणे यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांना मान्यवरांचा हस्ते पक्षाचा दूपट्टा प्रदान करीत स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपा प्रदेश कार्यालयातून आलेला आरमोरी विधानसभेचा पक्षाचा अधिकृत उमेदवाराकरिता असलेला पक्षाचा ए बी फार्म विद्यमान आमदार कृष्णा गजबे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक भाजपा तालुका अध्यक्ष चांगदेव फाये, संचालन प्रा. विनोद नागपूरकर तर आभार प्रदर्शन भाजपा ओबीसी आघाडीचे जिल्हा महासचिव रविन्द्र गोटेफोडे यानी केले. कार्यक्रमात भाजपा बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.