देसाईगंज येथील पदम कपडा बाजारचा मोठ्या थाटात शुभारंभ

13

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : व्यापारी नगरी म्हणून या देसाईगंज शहराची ओळख आहे. सन 1968 मध्ये देसाईगंज येथे संतोष शामदासानी यांनी पदम कपडा बाजारच्या नावाने व्यवसाय सुरू केला. नवीन लुक, नवीन अंदाज नवीन व्हेरायटी व्हेरायटी मुळे पदम कपडा बाजारचा स्थानांतरण तसेच भव्य शुभारंभ आज आयोजित करण्यात आला होता. हा शुभारंभ आमदार कृष्णाजी गजबे, भारतीय जनता पार्टीचे मा. जिल्हाध्यक्ष तथा लोकसभा निवडणूक प्रमुख किसनजी नागदेवे, सन्नीसाई दिलीपसाईजी जग्यासी, आसारामजी निरंकारी, जेसा मोटवानी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यापूर्वी देसाईगंज येथील नागरिक नागपूर, चंद्रपूर येथे कपडे घेण्यासाठी जात होते. परंतु संतोष शामदासानी आणि यांच्या मुलांनी देखील देसाईगंज शहरात कपड्याचा मोठा शोरूम सुरू करण्यात आला आहे.