कोपर्शीच्या जंगलात चकमक : 5 लक्षली ठार

13

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील भामरागड तालुक्यातील कोपर्शी गावानजीकच्या जंगलात पोलिस व नक्षलवादी यांच्यामध्ये आज मोठी चकमक उडाली. या चकमकीत ५ नक्षली ठार झाले आहेत. शिवाय एक जवान किरकोळ जखमी झाला असून, त्याच्यावर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीत घातपाताचा कट आखण्यासाठी मागील दोन दिवसांपासून कोपर्शीच्या जंगलात मोठ्या प्रमाणावर नक्षलवादी एकत्र आल्याची गोपनीय मिळताच अपर पोलिस अधीक्षक यतीश देशमुख आणि एम. रमेश यांच्या नेतृत्वात सी-६० पथकाच्या २२ आणि केंद्रीय राखीव दलाच्या जलद प्रतिसाद पथकाच्या २ तुकड्या त्या भागात नक्षलविरोधी अभियान राबविण्यासाठी रवाना करण्यात आल्या. पोलिस दिसताच नक्षल्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. पोलिसांनीही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. यात ५ नक्षलवादी ठार झाले. सर्वाचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले असून त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले. या चकमकीनंतर नक्षल्यांची शस्त्रे आणि अन्य साहित्यही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकी च्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये विध्वंसक कारवाया करून घातपात घडविण्याच्या उद्देशाने मागील दोन दिवसापासून काही माओवादी एकत्र येऊन कट रचनेच्या तयारीत असून ते गडचिरोली महाराष्ट्र व नारायणपूर छत्तीसगड सीमेलगत असलेल्या कोपर्शी तालुका भामरागड जंगल परिसरात दबा धरून बसण्याची गोपनीय सूत्रांकडून विश्वसनीय माहिती मिळाल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख व अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासन एम. रमेश यांच्या नेतृत्वात सी – 60 पथकाच्या 22 तुकड्या व सीआरपीएफच्या QAT च्या 2 तुकड्या या कोपर्शी जंगल परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी माओवाद विरोधी अभियान राबविण्याकरिता रवाना करण्यात आल्या.

सदर जंगल परिसरात पोहोचताच माओवाद्यांनी पोलीस पथकाच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. यावेळी पोलीस पथकाकडून माओवाद्यांना शस्त्र खाली टाकून शरण येण्याचे आवाहन करण्यात आले. परंतु माओवाद्यांनी शरण न येता पोलीस पथकावर अंदाधुंद गोळीबार सुरू ठेवला. सदर गोळीबाराला प्रत्युत्तर देताना पोलीस पथकाकडून दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार करावा लागला या अभियानात 5 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश प्राप्त झाले झाले. सदर जंगल परिसरात शोधमोहीम सुरू असून मृत माओवाद्यांची त्यांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे.