आमदार डॉ. देवराव होळी हे पुढचे आमदारच नाही तर मंत्री

23

– भटक्या जमातीचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रकाशजी लोणारे यांचे प्रतिपादन

– गडचिरोली येथे ढीवर, भोई व केवट समाजाच्या मेळाव्याला समाजाचा प्रचंड प्रतिसाद

– समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहण्आयाची आमदार डॉ. देवरावजी होळी यांची ग्वाही

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांचे कर्तुत्व अफाट असून ते ते विकासासाठी सतत पुढाकार घेत असतात. त्यामुळे ते गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील पुढचे आमदारच नाही तर या राज्याचे मंत्री होतील, असे प्रतिपादन महाराष्ट्र भाजपा भटक्या जमातीचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा विद्यमान भाजपा प्रदेश कार्यकारिणी पदाधिकारी प्रकाशजी लोणारे यांनी गडचिरोली येथे आयोजित ढीवर भोई व केवट समाजाच्या मेळाव्याच्या प्रसंगी उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन करताना केले.

यावेळी मंचावर गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी, ढीवर, भोई व केवट समाजाचे नेते सेवानिवृत्त मत्स्य अधिकारी सुखदेवजी मेश्राम, भाजपा नेते प्रमोदजी पिपरे, पंचायत समिती सदस्य जास्वंदाताई गेडाम, धीवर समाज सोसायटीचे अध्यक्ष सुरेश मेश्राम, सेवानिवृत्त अधिकारी गजाननराव डोंगरे, काटलीच्या माजी सरपंच श्रीमती खेडेकर, जेवलीचे उपसरपंच प्रीतम गेडाम, गोगाव ग्रामपंचायत सदस्य जीवन गेडाम, बोदली सोसायटीचे अध्यक्ष मोरेश्वरजी दाणे, कलसार मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी मंचावरील मान्यवरांनी उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन करताना समाजाच्या व देशाच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असून त्यासाठी अशा मेळाव्यांच्या माध्यमातून समाजाचे संघटन करण्याची संधी मिळत असल्याचे म्हटले. यावेळी आमदार डॉ. होळी यांनी आपण या समाजासाठी सतत सहकार्याच्या भावनेतून काम करीत असून पुढे भविष्यातही समाजाच्या असणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू, असा विश्वास त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित बांधवांना दिला.