संत सेवालाल महाराज बंजारा लभान तांडा समृध्दी योजनेची गावागावात केली जनजागृती

10
Oplus_0

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : संत सेवालाल महाराज बंजारा लभान तांडा समृध्दी योजनाचा लाभ घेण्यासाठी समितीचे पदाधिकारी प्रत्येक तांड्यात जाऊन योजनेबद्दल माहिती देऊन समाजाला जागृत करीत आहेत.

त्या अनुषंगाने 4 सप्टेंबर 2024 रोजी पांढरीभटाळ येथे संत सेवालाल महाराज मंदिरात जाऊन भोग भंडार कार्यक्रम घेऊन एडानुर, पांढरीभाटाळ, लसनपेठ, अबापूर, रावणपल्ली येथे नायक कारभारी यांच्या माध्यमाने सभेत तांडा कमिटी नेमली व सर्व योजनेची माहिती देण्यात आली  कमिटीने तांडा विकासासाठी आराखडा तयार करून लवकर समितीकडे सादर करण्यात यावा, असे सांगण्यात आले.

या समितीमध्ये अशासकीय सदस्य गोवर्धन चव्हाण, गोपाल साबळे, विनोद बनोट, गुरुदास गलाई यांचा समावेश आहे. हे चारही सदस्य यावेळी हजर होते. सोबत तांडा प्रवासी गुलाबसिंग घोती, उमरसिंग मठवण, मानसिंग घोती, व्यंकटराव साबळे, डोंगर खासावत यांच्यासाह प्रत्येक गावातील नायक कारभारी व गावातील नागरिक, महिलांची उपस्थिती होती.

सदर समिती गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक तांड्याला भेट देऊन समाज जागृती करत आहे व समाजाला या योजनेचा फायदा घेण्यासाठी आवाहन करत आहे.