जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

14

– काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त विश्वजित कोवासे मित्रपरिवार व युवक काँग्रेसतर्फे सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : काँग्रेसचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त विश्वजित मारोतराव कोवासे मित्रपरिवार व गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसतर्फे जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेच्या बक्षीस वितरणाला अध्यक्ष म्हणून गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान, माजी खासदार मारोतराव कोवासे विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, अजित सिंग, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव ऍड. विश्वजीत मारोतराव कोवासे, गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष नितेश राठोड यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

यामध्ये 8 ते 10 अ गट : प्रथम क्रमांक मयुरी संतोष नैताम, द्वितीय श्रेया जुमनाके, तृतीय संचीता संजय तिपाले, प्रोत्साहन बक्षीस आफियन कुरेशी, प्रोत्साहन धृष्णा विजय कायरकर, 11 ते 12 ब गट : प्रथम बक्षिस प्रज्वल सुनिल भसारकर, द्वितीय श्रवण महेंद्र गड्डमवार, तृतीय बक्षीस श्रेयस मोतीराम मोहूर्ले, प्रोत्साहन बक्षीस संघर्ष तानाजी भुरसे, प्रोत्साहन तनुश्री सुरेश कोटगले, खुला गट : प्रथम बक्षिस वैष्णवी पितांबर फुलझले, द्वितीय बक्षीस होमराज बंडु मोगरकर, तृतीय बक्षीस दिपक जगन्नाथ गुरूनुले, प्रोत्साहन बक्षीस लक्ष्मणबाबू पेदापल्ली, प्रोत्साहन बक्षीस राहूल दशरथ शेंडे, प्रोत्साहन बक्षीस राहुल राजू आत्राम यांना देण्यात आले.

यावेळी माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, गडचिरोली शहराध्यक्ष सतीश विधाते, हसनभाई गिलानी, गडचिरोली महिला काँग्रेस अध्यक्ष ऍड. कविताताई माहोरकर, गडचिरोली पर्यवारण सेलचे अध्यक्ष राजेश ठाकूर, गडचिरोली अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, गडचिरोली परिवहन सेलचे अध्यक्ष रुपेश टिकले, गडचिरोली सहकार सेलचे अध्यक्ष अब्दुलभाई पंजेवानी, गडचिरोली तालुका काँग्रेस अध्यक्ष वसंत राऊत, चामोर्शी तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रमोद भगत, धानोरा तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रशांत कोराम, काँग्रेसचे जेष्ठ नेते शंकरराव सालोटकर, युवक काँग्रेसचे महासचिव अतुल मल्लेलवार, गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे निरीक्षक पुष्पेद्र शाहू, मेघा सावसाकडे, महिला तालुकाध्यक्ष कल्पना नंदेश्वर, मंगला कोवे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष दिवाकर निसार, नदीम नाथानी, डॉ. सोनल कोवे, हरबाजी मोरे, सर्व शाळेतील शिक्षक वृंद युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी, युवक उपस्थित होते.