लांजेडा, इंदिरानगर व रामनगर येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा

13

– माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे व पिपरे पेट्रोलियम सर्व्हिसेस संचालक इंजि. अनुरागजी पिपरे यांच्याकडून सर्व बालगोपालांना उत्कृष्ट बक्षीस व खाऊचे वाटप

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : स्थानिक लांजेडा, इंदिरानगर व रामनगर येथे तान्हा पोळा सणानिमित्त नंदीबैल एकत्रीकरण व सजावट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे व पिपरे पेट्रोलियम सर्व्हिसेस चे संचालक इंजि. अनुरागजी पिपरे प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात भगवान शंकराचे पूजन व आरती करुन करण्यात आली. प्रसाद वितरण व त्यानंतर नंदीबैलांचे निरीक्षण करण्यात आले. माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्याकडून सर्व बाल गोपालांना सामूहिक बक्षीस व खाऊचे वाटप करण्यात आले. बक्षीस वितरणानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.