आमदार डॉ. देवरावजी होळी यांचे इंस्टाग्रामवर ५० हजार फॉलोअर्स

37

– केक कापून साजरा केला आनंदोत्सव, कार्यकर्त्यांचे मानले आभार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांचे सोशल मीडिया इंस्टाग्रामवर ५० हजार फॉलोअर्स झाल्याच्या निमित्ताने गडचिरोली येथील जनसंपर्क कार्यालयात केक कापून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी आपल्यावर प्रेम करणाऱ्या जनतेचे, कार्यकर्त्यांचे आभार मानले. यावेळी भाजपा गडचिरोली शहराचे अध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे, शिंदे गटाचे दीपकजी भारसाकडे, हर्षल गेडाम, विलास नैताम, सचिन येनप्रेड्डीवार, चेतन बोरकुटे, अरबाज शेख यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.