महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष जेसाभाऊ मोटवाणी यांचा शाल, श्रीफळ व नियुक्तीपत्र देऊन सत्कार

83

गडचिरोली : टिळक भवन (मुंबई) येथे महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी नवनियुक्त काँग्रेस ओ.बी.सी. सेलचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष जेसाभाऊ मोटवाणी यांचा शाल, श्रीफळ व नियुक्तीपत्र देऊन सत्कार केला. त्यावेळी नानाभाऊ पटोले म्हणाले की, ओबीसींचे आरक्षण टिकावं, त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी जे जे काही करावे लागेल ते काँग्रेस पक्ष करायला तयार आहे. त्यावेळी महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष डॉ. सुनील देशमुख, तसेच ओबीसी समाजाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी व अन्य मान्यवर उपस्थित होते.