– धानोरा येथे प्रभातफेरी काढून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत हुकूमशाही धोरणांचा केला निषेध
गडचिरोली : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली 14 नोव्हेंबरपासून सम्पूर्ण महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र सरकारने कृत्रिमरित्या वाढवलेल्या महागाई विरोधात जनजागर अभियान राबविण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून धानोरा तालुका काँगेस कमिटीच्या वतीने जनजागर अभियान राबविण्यात आले. काँग्रेसचे जनजागरण अभिनयान हे केंद्राच्या महागाईविरोधातील लोकचळवळ यशस्वी करण्याची गरज असल्याचे महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी प्रतिपादन केले. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, केंद्रातील सरकार हे बड्या उद्योगपती धार्जिणे सरकार असून या सरकारला सामान्य लोकांच्या प्रश्नाचा तसेच मागण्यांंचा विसर पडलेला आहे. म्हणून मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तुुंंची भाववाढ करून फक्त आपल्या उद्योगपती मित्रांचे पोट भरण्याचा काम हे सरकार करीत आहे. तेव्हा केंद्र सरकारला जीवनावश्यक वस्तुंंची जीवघेणी दरवाढ मागे घेण्यास भाग पाडण्यासाठी सर्वसामान्य लोकांनी पेटून उठले पाहिजे, असेे तेे म्हणाले. यावेळी धानोरा शहरात प्रभातफेरी काढून केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा व त्यांच्या हुकूमशाही धोरणांचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी प्रदेश काँग्रेसचे महासचिव तथा माजी आ. डॉ. नामदेवराव उसेंडी, जिल्हा कॉंग्रेस निरीक्षक डॉ. नामदेव किरसान, प्रदेश काँग्रेसचे सचिव डॉ. नितीन कोडवते, माजी जि. अ. हसनअली गिलानी, जिल्हा काँग्रेसचे महासचिव समशेरखा पठाण, जि. प. उपाध्यक्ष तथा ता. काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर पा.पोरेटी, ललीत बरछा, विनोद लेनगुरे, माजिद सय्यद, केसरी उसेंडी, राजू मोहूर्ले, प्रशांत कोराम, संजय चन्ने, कुलदीप इंदूरकर, ऋषी गुरनुले, महेश जिलेवार, शेवंता हलामी, पूनम किरंगे, करण पदेलवार, पुरुषोत्तम बावणे, नरेश मडावी, समीर कुरेशी, गोविंराव चौधरी, मारोती उइके, लक्ष्मण मडावी, मनिराम होळी, बाबुराव लोहंबरे, लक्ष्मण डोकरमारे, छगन जनबंधु, विनायक मडावी, आनंदराव कुमरे, जंगशा उसेंडी, सखाराम नैताम, रवींद्र सय्याम, गणेश बोमा, रेवनाथ सय्याम, केशव मडावी, धनिराम उसेंडी, दिनकर उईके, शेरखान पठाण, यशवंत दरो, विकास मोहुर्ले, अनिल चिंगली, दाजीबा नरोटे, मधुकर गावडे, ऋषी गुरनुले, प्रभाकर उसेंडी, परसराम पदा, मुबारक सत्यद आदी काँग्रेस पदाधिकारी व शेकडो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.